प्रत्येक विभागीय कार्यालय स्तरावर महिलांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी, विधवा, निराधार तसेच घटस्फोटित महिलांना समुपदेशन करण्याच्या उद्देशाने पंधरा महिला सक्षमीकरण केंद्रे आणि कौटुंबिक समुपदेशन व कायदेशीर सल्लागार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, या केंद्रांमार्फत महिलांना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची माहिती देणे, दक्षता समितीची माहिती, शिवाजीनगर न्यायालयातील पर्यायी तंटा निवारण केंद्राविषयी माहिती, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण, समाज विकास व आरोग्य विभागाच्या महिलांसाठीच्या योजना, महिलांना एकत्रित आणणे, लोकांची मानसिकता बदलणे, आर्थिक सक्षमीकरण, महिलांना स्वतंत्र ओळख निर्माण करुन देणे, महिलांमध्ये निर्णयक्षमता विकसित करणे, विशेष कार्य करणाऱ्या महिलांकडून मार्गदर्शन आणि सर्व सरकारी योजनांबाबत माहिती दिली जाते.
शहरातील महिला सक्षमीकरण/ कौटुंबिक समुपदेशन आणि कायदेविषयक सल्ला केंद्रे
कार्यालय |
पत्ता |
औंध |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , इंडो ब्रेमेन चौक , औंध बॉडीगेट , पुणे -07 |
घोले रोड |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , काळे प्लाझा , पंचमुखी मारुती मंदिराजवळ , शिवाजी नगर , गावठाण , पुणे ५ |
केळेवाडी |
सर्व्हे नं . 44, मामासाहेब मोहोळ प्राथमिक शाळा परिसर , केळेवाडी , पौड रोज , कोथरुड , पुणे -38 |
वारजे - कर्वे नगर |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , स्वप्नशील व्यावसायिक इमारत , पुणे -38 |
कै.बी.एस. ढोले पाटील रस्ता |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , ढोले पाटील मार्केट बिल्डिंग , पुणे -01 |
नगर रोड(वडगाव शेरी) |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , नगर रोड , रामवाडी , पुणे -14 |
येरवडा |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , नगर रोड , संगम हॉटेलच्या समोर , पुणे -06 |
गंज पेठ |
सावित्रीबाई फुले मेमोरियल , सेंट्रल फायर ब्रिगेडच्या मागील बाजूस , डांबर कोठी परिसर , गंज पेठ , पुणे -42, संपर्क - 020-26454442 |
सहकार नगर |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , उत्सव बिल्डिंग कॉर्नर , मार्केटयार्ड , पुणे -37 |
विश्रामबाग वाडा |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , पुणे मनपा व्यावसायिक इमारत , सदाशिव पेठ , शनिपारजवळ , पुणे -30 |
टिळक रोड |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , शिवाजी नगर ढेरे उद्योग भवन , टिळक रोड , पुणे -30 |
हडपसर |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , पंडीत जवाहरलाल नेहरु , भाजीपाला मार्केटजवळ , हडपसर , पुणे -28 |
बिबवेवाडी |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , उत्सव इमारत , दुसरा मजला , शिवनेरी रस्ता , मार्केट यार्ड कॉर्नर , पुणे -37 |
धनकवडी |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , सर्व्हे नं २ , सावंत कॉर्नर बिल्डिंगच्या मागे , कात्रज , पुणे - -46 |
कोंढवा -वानवडी |
सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालय , के .पी .टी .सी टाऊन , फातिमा नगर , विशाल मेगा मार्ट , इनामदार हॉस्पिटल जवळ , पुणे -40 |