किटकजन्य आजार नियंत्रण

किटकजन्य आजार नियंत्रण विभाग - 

किटक प्रतिबंधक विभाग -

 1. किटक विभाग
 2. हिवताप विभाग
 3. प्रशासकीय शुल्क वसूली विभाग

किटक नियंत्रण विभागामार्फत देण्यात येणा-या सेवा - 

 1. घरोघरी डासोत्पत्ती ठिकाणे शोधणे व नष्ट करणे.
 2. साप्ताहिक अळी नाशक औषध फवारणी व डेंग्यू आजार झालेल्या रूग्णाच्या रहिवासी क्षेत्रात धुरफवारणी करणे.
 3. मुळा-मुठा व इतर जलस्त्रोतातील जलपर्णी नष्ट करणे.
 4. पुणे म.न.पा कार्यक्षेत्रातील नाल्यांमध्ये अळी नाशक औषध फवारणी करणे.
 5. किटकजन्य आजार सदृश्य रूग्णांच्या व इतर भागात डास निर्मूलनाबाबत तक्रारींचे निराकरण करणे.

नागरी हिवताप निर्मूलन कार्यक्रम विभाग -

 1. तापी रूग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षणाद्वारे रक्तनमुने गोळा करणे व म.न.पा दवाखान्यातून तपासणी करून घेणे.
 2. मलेरिया जंतू असलेल्या रक्तनमुन्याच्या रूग्णास संपुर्ण मलेरिया उपचार करणे.
 3. दैनंदिन स्वरूपात संपुर्ण शहरातील मोठी रूग्णालये, रक्त तपासणी प्रयोग शाळा यांचे कडून किटकजन्य आजार सदृश्य रूग्णांची माहिती गोळा करणे.

प्रशासकीय शुल्क वसूली विभाग -

मा.स्थायी समिती पुणे म.न.पा यांच्या ठराव क्र.४८९ / दि.१०/०७/२०१२ नुसार १०० चौरस फूट एवढ्या आकाराच्या रहिवासी / व्यवसायिक जागेमध्ये किटकनाशक औषधांची फवारणी करण्याकरिता रक्कम रू. २५० /- एवढे प्रशासकीय शुल्क आकारण्यात येते. ही सुविधा नागरिकांच्या मागणीवरून देण्यात येते. ढेकूण, झुरळ, किटकांच्या उपद्रव निर्मूलनसाठी नागरिक या सेवेची मागणी करू शकतात.

पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जलस्त्रोतातील जलपर्णी निर्मूलन करण्याकरीता किटक प्रतिबंधक विभागांतर्फे करण्यात येणारी कार्यवाही –

 1. संपुर्ण मुळा-मुठा व राम नदी तसेच तलावामधील जलपर्णी बोट, स्पाइडरमॅन, मशीन, व जेसीबी यंत्राने कर्मचारी दर शनिवारी काढून टाकतात.
 2. नदीपात्रालगत लहान डबक्यांमध्ये डासोत्पत्ती होवू नये म्हणून त्यावर साप्ताहिक स्वरूपात अळीनाशक औषध फवारणी करण्यात येते.

जनजागृती कार्यक्रम - 

 1. पॅम्पलेट्स.
 2. स्टीकर व बॅनर्स.
 3. मोबर्इल मध्ये मेसेज पाठविणे.
 4. रेडिओ प्रसारण.
 5. माहिती पुस्तिका.
 6. सर्व स्थरातील शाळा, कॉलेजेस यांच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत सभा.
 7. पी.एम.पी.एल बसेस वर पोस्टर्स, स्टीकर्स लावणे.
 8. सहकारी सोसायटी चेअरमेन / रहिवासी यांची बैठक.
 9. टिव्हीवर ‘टीकर टेप’ प्रसारीत करणे.
 10. शहरी गरीब वस्तीतील बचत गट, अंगणवाडी, गणेश मंडळ सोबत सभा / बैठका.
 11. शालेय विद्यार्थ्याबरोबर प्रभात फेरी.
 12. वैद्यकीय व्यवसायीकांच्या विविध संघटनांबरोबर बैठक / सभा.