माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

रस्ते खोदाई परवाना व्यवस्थापन प्रणाली

दूरध्वनी, वीज, सांडपाणी किंवा गॅसपुरवठा आदी कारणांसाठी आवश्यक त्या खोदाई संदर्भातील परवानगीसाठी ऑनलाईन रस्ते खोदाई परवाना व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सध्या ही पद्धती मनुष्यबळाद्वारे हाताळण्यात येते. त्यामुळे वेळ आणि अधिक श्रम लागतात. तसेच त्यामध्ये मानवी चुका होण्याची शक्यता असते. ऑनलाईन पद्धतीमध्ये खालील वैशिष्ट्यांचा समावेश आहे –

  • रस्ते खोदाईसाठी अधिकृत परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ते अर्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील कागदपत्रे जमा करण्याची सुविधा
  • रस्ते अभियंत्यांना अर्जाची छाननी करून इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील अहवाल तयार करण्याची सुविधा
  • रस्ते विभागातील अधिकार्‍यांना रस्ते खोदाईसाठी मागणीपत्र, कार्यादेश आणि कार्यपूर्तीचे प्रमाणपत्र देण्याची सुविधा
  • रस्ते खोदणार्‍या संस्थांना आवश्यक ते शुल्क लेखाशाखेत अदा करण्याची सुविधा
  • विभागप्रमुखांना रस्ते खोदाईसंदर्भातील सर्व अर्ज आणि नकाशावरील प्रत्यक्ष कार्य यांची माहिती प्राप्त होते.