ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन

'ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन' समारोप

पुणे महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन २०२०' अंतर्गत कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्याच्या अनुषंगाने नागरिकांसाठी ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. छत्रपती संभाजी उद्यान येथे भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला जवळपास ६५०० ते ७००० नागरिकांनी भेट दिली. तसेच मा सभासद व मोहल्ला कमिटीचे सदस्य यांनीही या प्रदर्शनाला उपस्थिती दर्शविली. या क्षेत्रात काम करणारे काही विद्यार्थी खास सांगलीहून हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यांनी हे प्रदर्शन त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त केली.

या प्रदर्शनाचा समारोप मा. आयुक्त सौरव राव यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देवून सविस्तर माहिती जाणून घेतली. सहभागाबद्दल स्टॉलधारकांना गुलाबपुष्प दिले. तसेच आवश्यक त्या सूचनाही केल्या. यावेळी राव यांनी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधला.

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सहभागी झालेल्या सर्व स्टॉलधारकांचे तसेच प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी योगदान देणार्‍या सर्व अधिकारी-कर्मचा-यांचे आभार मानले.