OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

हरवलेला प्राणी नियंत्रण

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विकसनशील देशांमधील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हा एकमेव वैज्ञानिक उपाय आहे.

कुत्र्यांना मारुन टाकणे किंवा त्यांना दुसरीकडे सोडणे हा त्यावरील उपाय नाही. कुत्रा हा समुहात राहणारा प्राणी आहे. जर काही कुत्र्यांना एका भागातून दुसरीकडे नेले तर त्यांच्यासोबत राहणारी इतर कुत्रीदेखील या भागात दाखल होतील. दरवेळी नव्याने आलेल्या कुत्र्यांचे लसीकरण किंवा नसबंदी शक्य नाही. त्यापेक्षा, दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी सर्व कुत्र्यांची नसबंदी करणे हाच योग्य उपाय आहे.

याआधी १९९३ साली भटक्या कुत्र्यांची सामुहिक हत्या करण्याचा प्रयत्न फसला होता. यामुळे रेबिजचा प्रादुर्भाव वाढला आणि भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली होती. त्यानंतर, जानेवारी १९९४ पासून नसबंदी(प्राणी जन्म नियंत्रण) हेच सरकारचे अधिकृत धोरण आहे.

पुणे महानगरपालिकेचे श्वानपथक अशा सर्व भटक्या कुत्र्यांना एकत्र करुन नायडू हॉस्पिटल पाऊंड येथे नेईल. तेथे त्यांच्यावर उपचार केले जातील. त्यांना रेबिजची लस टोचली जाईल आणि दोन ते चार दिवसांमध्ये परत आणून सोडले जाईल. कुत्र्याची नसबंदी झाली आहे हे सूचित करण्यासाठी त्याचा डावा कान टोचला जाईल.

कायद्यानुसार ज्या जागेवरुन कुत्र्यांना उचलले आहे तेथेच परत आणून सोडले जाईल.

मात्र, या कायद्यातील काही तरतुदींनुसार(प्राणी जन्म नियंत्रण कायदा २००१, कलम ३८, उप विभाग(१)) खालील बाबी रस्त्यावरुन उचलणे कायदेशीर गुन्हा आहे.

 • स्तनपान करणाऱ्या माता आणि त्यांची पिलांना उचलणे.
 • सहा महिन्यांपेक्षा लहान पिलांना उचलणे.
 • नसबंदी झालेल्या कुत्र्यांना पुन्हा उचलणे .
 • कुत्र्यांना एका जागेवरुन दुसरीकडे नेण्यास मनाई.
 • शहाराच्या वेशीबाहेर या कुत्र्यांना नेऊन सोडणे .

तुम्ही काय मदत करु शकता?

 • तुमच्या भागातील भटकी कुत्री शोधण्यास महापालिकेला मदत करा जेणेकरुन त्यांची नसबंदी करता येईल.
 • या कुत्र्यांना तुमच्या भागातून दुसरीकडे नेऊन सोडण्यासाठी पीएमसीच्या कर्मचाऱ्यांना आग्रह करु नका.
 • कचऱ्याचे प्रमाण वाढले की कुत्र्यांचा प्रजनन दर वाढतो. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकू नका.
 • इतरांनादेखील कुत्र्यांच्या नसबंदीचे महत्त्व समजावून सांगा.
 • प्रत्येक सोसायटीने एक किंवा भटक्या कुत्र्याला दत्तक घेऊन त्याचे जेवण, नसबंदी आणि लसीकरणाची जबाबदारी घ्यावी. ही कुत्री तुमच्या सोसायटीचे रक्षण करतील तसंच इतर कुत्र्यांना येण्यास अडथळा निर्माण करतील.

संपर्क माहिती -

यासाठी पीएमसी केअरशी संपर्क साधा.

 • टोल फ्री क्रमांक: 1800 1030 222
 • व्हॉट्सअप/एसएमएस: 9689900002

सामाजिक संस्था आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागनिहाय यादी

 • विभाग १- घोले रोड, औंध, वारजे, करवेनगर, कोथरूड
 • संलग्न एनजीओ – सोसायटी फॉर प्रिवेन्शन क्रुएल्टी टू एनिमल(एसपीसीए नांदेड)
 • वैद्यकीय अधिकारी-
 • विभाग २- ढोले पाटील, नगर रोड, संगमवाडी
 • संलग्न एनजीओ- सोसायटी फॉर अनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर