खेळाडूंसाठी सुविधा 

महानगरपालिका परिसरात असलेल्या क्रीडा सुविधांचा खेळाडूंना लाभ दिला जातो. महानगरपालिका परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनपाच्या क्रीडा संकुलातील एकूण खेळाडूंच्या क्षमतेच्या २५% जागांवर मोफत क्रीडा सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी क्रीडा विभागाकडे अर्ज केल्यानंतर सदर अर्जावर आवश्यक ती मान्यता घेऊन क्रीडा सुविधांचा लाभ खाजगी शालेय विद्यार्थ्यांना मनपाने ठरविलेल्या सवलतीच्या दरात घेता येईल.

अटी व शर्ती

  1. म.न.पा. परिसरातील म.न.पा. शालेय विद्यार्थ्यांना मनपाच्या क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांचा लाभ घेता येईल. याकरिता प्राथमिक व माधमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी क्रीडा विभागाकडे रितसर अर्ज करुन परवानगी घेणे आवश्यक आहे.
  2. खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी क्रीडा विभागाकडे अर्ज करावा.  सदर आवश्यक ती मान्यता घेऊन आदेश काढल्यानंतरच क्रीडा सुविधांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात घेता येईल.
  3. खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळांडूना मनपाच्या क्रीडा संकुलातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी म.न.पा.ने ठरवून दिलेले शुल्क भरावे लागेल. याकामी खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी रितसर अर्ज करणे आवश्यक आहे.

खेळाडूंकरिता मनपा संकुलातील उपलब्ध क्रीडा सुविधा

अ.क्र. तपशील सुविधा  स्पर्धा स्तर
1. खुल्या गटातील खेळाडू विनामुल्य     आंतरराष्ट्रीय (सहभाग)
2. मनपा शाळेतील खेळाडू विनामुल्य २५% जागा राखीव  जिल्हा व राज्यस्तरिय प्राविण्य
3. खाजगी शाळेतील खेळाडू मनपाने ठरविलेल्या सवलतीच्या दरामध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्राविण्य