अनिवासी क्रीडा निकेतन

शहरातील खेळाडूंना स्थानिक पातळीवर खेळासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सिंहगड रोड येथे खाशाबा जाधव अनिवासी क्रीडा निकेतन सुरू करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे, हडपसर येथे भारतरत्न सचिन तेंडूलकर क्रीडा निकेतन कार्यरत आहे तर येरवडा येथे क्रीडा निकेतन शाळा कार्यरत आहे. सिंहगड रोड येथील क्रीडा निकेतनमध्ये कबड्डी, खो-खो, मल्लखांब, योग, कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. येरवडा परिसरातील क्रीडा निकेतनमध्ये विद्यार्थ्यांना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, योग, कुस्ती हे क्रीडा प्रकार शिकविले जातात तर हडपसर येथील क्रीडा निकेतनमध्ये हॅन्डबॉल, थ्रोबॉल, योगा, मल्लखांब, कुस्ती, अॅरथलॅटिक्स इत्यादी क्रीडा प्रकार शिकविले जातात. 

खाशाबा जाधव अनिवासी क्रीडा निकेतनच्या धर्तीवर क्षेत्रिय आयुक्त क्र. १ ते ५ यांच्या परिमंडलात किमान प्रत्येकी एक अनिवासी क्रीडा निकेतन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शालेय स्तरावरील उदयोन्मुख २५ खेळाडू (शासन निर्णयानुसार) मनपा व खाजगी शाळांमधील विद्यार्थी क्रीडा निकेतनमध्ये प्रवेशास पात्र ठरतील. अनिवासी क्रीडा निकेतनमध्ये प्रवेशाकरिता शाळाप्रमुखांनी शिफारशीसह त्यांच्या शाळेतील उदयोन्मुख खेळाडूंची यादी क्रीडा विभागाकडे सादर केल्यानंतर  क्रीडा समितीच्या मान्यतेने अंतिम निवड झालेल्या २५ खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अनिवासी क्रीडा निकेतनमध्ये प्रवेश घेणार्यात विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे किमान ५ वर्षांपासून पुणे शहरामध्ये वास्तव्य असावे. 

प्रवेश प्रक्रिया 

 • क्रीडा निकेतनमध्ये प्रवेशासाठी केवळ शिक्षण विभाग पुणे मनपा मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता तिसरीचे विदयार्थी व विदयार्थीनी पात्र ठरतील. तसेच हे विद्यार्थी इयत्ता पहिलीपासूनच शिक्षण विभागाच्या शाळेत शिक्षण घेणारे असावेत.
 • इयत्ता तिसरीच्या वर्गाची शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस शारीरिक क्षमता चाचणी प्रथमतः शिक्षण संघटक विभागीय पातळीवर घेण्यात येईल. त्यानंतर विभागातील गुणवत्ताधारकांची अंतिम पातळीवर पुन्हा शारीरिक क्षमता चाचणी घेऊन अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
 • सुरुवातीला इयत्ता चौथी इयत्तेच्या एका वर्गासाठी २५ मुले व २५ मुली अशी एकूण ५० विदयार्थ्याची गुणवत्ता यादी तयार केली येईल. तसेच त्यापुढील २५ मुले व २५ मुलींची गुणानुक्रमे प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. या सर्वांची मनपा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तपासणीत सक्षम आढळलेले विदयार्थी प्रवेशासाठी पात्र ठरवले जातील. 
 • गुणवत्ता यादीतील एखाद्या विदयार्थ्याने अथवा विदयार्थिनीने काही कारणास्तव प्रवेश रद्‌द केल्यास प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे विदयार्थी व विदयार्थिनींची निवड केली जाईल.
 •  वर्ग तुकड्यांच्या संख्येत नैसर्गिक पद्धतीने वाढ होईल. भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा क्रीडाविषयक सुविधा त्याप्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातील.

 

पुणे शहरातील क्रीडा निकेतन आणि त्यांची क्षमता

अ.क्र.

शाळेचे नाव व पत्ता

एकूण पट

१.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव

क्रीडा निकेतन, सिंहगड रोड

मुले - ११०

मुली - ७६

एकूण - १८६

२.

भारतरत्न सचिन तेंडूलकर

क्रीडा निकेतन, हडपसर

मुले - ११९

मुली - १०९

एकूण -२२८

३.

क्रीडा निकेतन शाळा, येरवडा

मुले - ६३

मुली - ४७

एकूण -११०

 

 

माध्यमिक विभाग

अ.क्र.

शाळेचे नाव व पत्ता

९ वी   

१० वी

एकूण

१.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडा निकेतन, सिंहगड रोड

मुले -१८
मुली-१३
एकूण - ३१

मुले -१७ 
मुली-१०
एकूण - २७
 

मुले -३५
मुली-२३
एकूण - ५८
 

 

क्रीडा नैपुण्य शोध चाचणी
प्रत्येक मुलामध्ये एखादे वैशिष्ट्य दडलेले असते, ते शोधून त्यांना योग्य क्रीडा प्रकार सुचविले व योग्य मार्गदर्शन केले तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करता येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी व त्यांचे विविध खेळातील नैपुण्य वाढविण्यासाठी शहरातील तिन्ही क्रीडा निकेतनांमध्ये या विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण, पोषक आहार व आवश्यक साहित्य शिक्षण विभागाकडून पुरविले जाते. सध्या क्रीडा निकेतनमध्ये एकूण ६०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून त्यांना विविध देशी व विदेशी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या शारिरीक ठेवणीचा तसेच स्नायूंच्या रचनेचा अभ्यास करुन त्या मुलांच्या किंवा मुलींच्या अंगी असलेल्या उपजत क्रीडा नैपुण्याचा शोध घेणे हा या योजनेचा हेतू आहे. विद्यार्थ्यांच्या खालील चाचण्या घेऊन त्यांच्यातील क्रीडा नैपुण्याचा शोध घेणे प्रस्तावित आहे - 
•    Speed Testing
•    Muscle Power Testing
•    Flexibility Testing
•    Agility Testing
•    Muscle Strength Testing
•    Muscle Endurance Testing

चाचणीनंतर काही कमतरता असल्यास याबाबत मार्गदर्शनाव्दारे विद्यार्थ्यांमधील कमतरता दूर करता येईल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा निकेतनमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांची क्रीडा नैपुण्य शोध चाचणी क्रीडा विभागामार्फत करण्याचा मानस आहे.

क्रीडा नर्सरी 
पुणे शहर क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राहण्यासाठी तसेच मुला-मुलींमध्ये व नागरिकांमध्ये खेळाची/ व्यायामाची आवड जोपासण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. पुणे शहरातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार सुविधा या बाबी केंद्रस्थानी ठेऊन खेळाडूंसाठी हिताच्या शिफारशी उपाययोजना क्रीडा धोरणात सुचविलेल्या आहेत. त्यानुसार पुणे शहर परिसरात क्रीडा नर्सरीच्या माध्यमातून विविध खेळांचा व खेळाडूंचा विकास करण्याचा मानस आहे.
बालवयात मुलांना खेळांची आवड निर्माण करणे, मैदानाशी नाते जोडणे, मनोरंजनातून खेळांची माहिती करून देता यावी यासाठी क्रीडा नर्सरीची स्थापना करणे आवश्यक आहे. शासनमान्य नोंदणीकृत संस्थाना क्रीडा नर्सरी स्थापन करण्यासाठी साधन व सुविधांची मदत देऊन प्रोत्साहित करण्यात येऊन क्रीडा नर्सरीमध्ये ३ ते १२ वयोगटाच्या मुलांना प्रवेश देण्यात येईल. लहान मुलांचे ३ ते ७ व ८ ते १२ अशा दोन गटांत विभागणी करण्यात येऊन सकाळ व संध्याकाळ सत्रात स्पोर्टस नर्सरी कार्यान्वित राहतील. 
प्रशिक्षक मानधन,  क्रीडा साहित्य, व्यवस्थापन, क्रीडांगण देखभाल यासाठी पुणे महानगरपालिकेकडून अनुदान देण्यात येईल सदर क्रीडा नर्सरीच्या अभ्यासक्रमामध्ये जनरल, फिटनेस, मनोरंजनात्मक खेळ, जिम्नॅस्टिक, अॅ थलेटिक्स इत्यादी खेळांचा समावेश असेल. तसेच वैयक्तिक खेळांच्या सुध्दा स्वतंत्र क्रीडा नर्सरी सुरू करण्यात येतील. जेणेकरून लहान वयात मुलांना खेळांची आवड निर्माण होईल व खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण सुध्दा मिळेल.
 

उद्दिष्टे-

 1.  पुणे महानगरपालिकेचे क्रीडा धोरण २०१३ मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे एका प्रभागात एक क्रीडा नर्सरी सुरु करणे.
 2. मनपा शाळा, मनपा वसाहती, मनपा क्रीडांगण इत्यादी ठिकाणी अंगणवाडीच्या धर्तीवर क्रीडा नर्सरी योजना चालू करणे.
 3.  बालवयात मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण, मैदानाशी नाते जोडणे, मनोरंजनातून खेळांची माहिती करून देणे.

अटी व शर्ती-

 1.  पुणे महानगरपालिका क्षेत्रात पुणे महानगरपालिकेचे क्रीडा धोरण २०१३ नुसार सुरू करण्यात येणार्याप क्रीडा नर्सरीसाठी येणारा खर्च महानगरपालिकेच्या प्रतिवर्षीच्या अंदाजपत्रकात क्रीडा समितीकडून तरतूद करण्यात यावी.
 2.  प्रत्येक क्रीडा नर्सरीसाठी प्रती विद्यार्थी येणारा खर्च ठरविण्याचे अधिकार हे क्रीडा समितीला राहतील.
 3.  अंगणवाडीच्या धर्तीवर नर्सरीमध्ये शिक्षक/ शिक्षिकांची मानधनावर नेमणूक करण्यात यावी. (नागरवस्ती शिक्षकांच्या इतकेच मानधन असावे.)
 4.  क्रीडा नर्सरी चालविणार्याम संस्थांनी लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. 
 5. मनपा हद्‌दीतील क्रीडा मैदानासाठी आरक्षित मैदाने, खुल्या जागा, अॅमिनिटी स्पेस असलेल्या जागेवर क्रीडा नर्सरी सुरु करता येईल.