माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

सोशल मीडिया सेल

आदर्श लोकशाहीच्या पायाभरणीमध्ये नागरिकांचा सरकारमध्ये सहभाग असतो. मतदान आणि मतदान प्रक्रियेतील सहभाग या पारंपरिक पद्धतीच्या पलिकडे आज नागरिकांना सहभागाची संधी प्राप्त होत आहे. डिजीटल सोशल मिडिया जसे की फेसबुक, ट्विटर आदी यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवा नागरिकांच्याच सहभागाने सह-उत्पादन आणि सह-वितरण करून पुरविण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून योग्य संदेश देऊन पारदर्शक, प्रतिसादात्मक प्रशासनातून नागरिकांना चांगल्या समाजाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करणे हे पुणे महानगरपालिकेचे अंतिम उद्दिष्ट आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात येते. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार्‍या सेवांमध्ये सुधारणा करून नागरिकांचा पारदर्शक प्रशासनावर विश्वास दृढ होण्यास मदत होते.

धोरणात्मक उद्दिष्टे

 • संवाद:
  • नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मिडिया माध्यमांचा उपयोग करणे
  • निवडक सोशल मिडिया माध्यमांचा पुणे महानगरपालिकेतील प्रत्येक विभागाने नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपयोग करावा.
  • नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे दिलेल्या तक्रारीची पोचपावती आणि त्याचा पाठपुरावा करणे
 • योगदान:
  • नागरिकांना त्यांच्या संकल्पना आणि विचार सोशल मिडियाचे माध्यम उपलब्ध करून देणे
  • धोरण निर्मिती, मतदान, प्रतिसाद देण्याचे आवाहन आदी उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळावा यासाठी सोशल मिडिया माध्यमातून मोहिम राबविणे.
  • विकी/सोशल मिडियाच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार निर्माण करणे
 • एककेंद्राभिमुखता:
  • पुणे महानगरपालिकेच्या एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व सेवांचा प्रसार करणे
  • नागरी सहभागी कृतींसाठी सोशल मिडिया हे सहयोगी माध्यम असल्याचा प्रसार करणे
  • पुणे महानगरपालिकेची एकूण प्रतिमानिर्मिती करणे

सोशल मिडियाचा अधिक प्रभावीपणे उपयोग व्हावा यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये स्वतंत्र सोशल मिडिया टीमची स्थापना करण्यात आली आहे.

या टीममध्ये खालील पदे आहेत :

 • सोशल मिडिया व्यवस्थापक (Social Media Manager)
 • माहिती व्यवस्थापक (Content Manager)
 • माहिती लेखक (Content Writer)

ही टीम माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुखांच्या नियंत्रणाखाली काम करते. माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख मा. महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांना अहवाल सादर करतात.

मार्गदर्शक तत्वे

सोशल मिडियाकडे तटस्थ दृष्टिकोनातून पाहावे यासाठी मार्गदर्शक तत्वे

 • अधिकार: इतर व्यक्तींशी संदर्भात असलेल्या, न्यायालयीन प्रकरणासंदर्भातील, प्रस्तावित मसुद्यासंदर्भातील प्रतिक्रियांवर सूचना दिल्याशिवाय प्रतिसाद न देणे.
 • प्रासंगिकता: पुणे महानगरपालिकेसंदर्भातील प्रतिक्रियांवर आणि नागरिकांना उपयुक्त ठरेल अशाच स्वरुपातील प्रतिक्रिया किंवा नागरिकांच्या प्रतिक्रियांवर प्रतिसाद द्यावा.
 • व्यावसायिकता: विनयशील व्हा, सवयी व्हा आणि सर्वांचे आदर करा.
 • स्पष्टपणा: प्रतिक्रिया सकारात्मक असो अथवा नकारात्मक प्रतिक्रियांबाबत स्पष्टपणा ठेवावा. प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणे गरजेचे नाही.
 • अनुपालन: सर्व नियम आणि अटींचे पालन करा. कॉपीराईचे उल्लंघन करणे टाळा.
 • गोपनीयता: कोणत्याही व्यक्तीची खाजगी माहिती उघड करू नका. तसेच पुणे महानगरपालिकेसंदर्भातील नागरिकांना वापरता येईल अशी उघड करता येण्याजोगीच माहिती उघड करा. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेसंदर्भातील कोणतीही माहिती उघड करू नका.
 • नागरिकांना माहितीपूर्ण आणि आवश्यक असणारा मजकूरच शेअर करा.
 • शेअर केलेला मजकूर पुणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करणारा असावा. तसेच कृतिशील माहिती पोस्ट करण्यात यावी.
 • राजकीय किंवा धार्मिक विषयासंदर्भातील मजकूर पोस्ट करू नका.

सोशल मिडिया हॅण्डल्स