माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मोबाईल अॅप

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने सांडपाणी व्यवस्थापन विभागाने प्रकल्पावर कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पंप ऑपरेटर्स, अभियंते आणि प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासाठी मोबाईल अॅप तयार केले आहे.

या अॅपचे वैशिष्ट्ये –

  • प्रकल्प व्यवस्थापकांना संपूर्ण प्रकल्पाच्या सर्व विभागांच्या कामकाजाची, प्रत्येक घटकाची आणि त्या घटकाच्या परिमाणांची तसेच विश्रांती आणि प्रतिबंधात्मक देखभाल याबाबतची माहिती प्राप्त करून घेता येते.
  • प्रकल्पाच्या विविध विभागातील घटकांबाबत आणि पंप ऑपरेटरबाबतची अद्ययावत माहिती पाहण्याची सुविधा
  • प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना शहरातील प्रत्येक प्रकल्पातील दररोजच्या देखभालीबाबतची माहिती पाहण्याची सुविधा
  • प्रकल्पातील विविध घटक आणि विविध विभागांतील पंप अभियंत्यांना प्रकल्प व्यवस्थापक आणि विभाग प्रमुखांमार्फत कामे नेमून देता येतात.
  • शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अद्ययावत माहिती नागरिकांना पाहण्याची सुविधा.