माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

गुणतक्त्याच्या उपक्रम

गुणतक्त्याच्या उपक्रम

स्मार्ट प्रशासनाच्या चौकटीत मूल्यांकन आणि देखरेखीच्या कामगिरीला अत्यंत महत्त्व आहे. तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि संबंधित विभागाचे कौशल्य या संदर्भातील त्रुटी शोधण्यासाठी मूल्यांकन ही अत्यंत गुंतागुंतीची बाब आहे. कार्यक्षमतेसंदर्भातील निर्देशांकामधून अत्यंत महत्वाची माहिती मिळाल्याने त्यातून संबंधित विभाग प्रमुखाला विश्वसनीय स्मार्ट प्रशासनाच्या पैलूंपर्यंत पोहोचविण्यास मदत करतात. विभागीय स्तरावरील स्मार्ट गर्व्हनन्सची उद्दिष्टे गाठण्यासाठी आवश्यक त्या पैलूंची प्रगती पाहण्यासाठी हा गुणतक्ता उपयोगी ठरतो.

प्राईज वॉटर कॉर्पोरेशनने स्मार्ट प्रशासनाच्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठी पाच प्रमुख पैलूंवर आधारित गुणतक्ता तयार केला आहे. ते पाच पैलू खालीलप्रमाणे

  • सेवांचे वितरण
  • अंतर्गत कार्ये
  • सुसंवाद आणि दुवा
  • सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती आणि नवतंत्रज्ञानाचा अवलंब
  • कर्मचारी

सेवांचे वितरण

विविध विभागांकडून नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सेवांचे आणि त्या संबंधातील प्रमुख मुद्यांचे मूल्यमापन खालीलप्रमाणे :

मूल्यमापनाचे परिमाण

सविस्तर माहिती

संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सेवांची टक्केवारी?

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सेवांचे मोजमाप

मोबाईल डिव्हाईसेसवर उपलब्ध असलेल्या सेवांची टक्केवारी

मोबाईल डिव्हाईसेसद्वारे उपलब्ध असलेल्या सेवांचे मोजमाप

ज्या सेवांसाठी प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची गरज नाही (हार्ड कॉपी) अशा सेवांची टक्केवारी

या परिमाणाद्वारे ज्या सेवांना कोणतीही कागदपत्रे किंवा नस्ती किंवा कोणत्याही स्वरुपात प्रत्यक्ष अर्ज वा तत्सम बाबी सादर कराव्या लागत नाहीत अशा सेवांचे मोजमाप. अशा सेवांचा लाभ केवळ संकेतस्थळाद्वारे किंवा मोबाईलच्या माध्यमातून संबंधित विभागाशी प्रत्यक्ष संपर्क न करता कोणत्याही कागदाशिवाय (पेपरलेस) पद्धतीने घेता येतो.

ज्या सेवांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाला भेट द्यावी लागत नाही अशा सेवांची टक्केवारी

ज्या सेवांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाला भेट द्यावी लागत नाही अशा सेवांचे मोजमाप.

ज्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन शुल्क अदा करण्याची सुविधा आहे अशा सेवांची टक्केवारी

ज्या सेवा वापरताना ऑनलाईन शुल्क अदा करण्याची सुविधा आहे अशा सेवांचे मोजमाप.

अंतर्गत कार्ये - 

अंतर्गत कार्यांबाबतच्या प्रमुख मुद्यांचे मूल्यमापन खालीलप्रमाणे :

मूल्यमापनाचे परिमाण

सविस्तर माहिती

जी कार्ये बॅकएंडला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येतात अशा कार्यांची टक्केवारी

तंत्रज्ञानाच्या ज्या कार्यपद्धती सुव्यवस्थितपणे कार्यरत आहेत अशा बॅकएंड कार्याचे मोजमाप

सेवा प्राप्त करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सेवांची टक्केवारी

ज्या सेवा देण्याकरिता कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे अशा सेवांचे मोजमाप

सुसंवाद आणि दुवा -

विभागाचे कामकाज सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी आवश्याक त्य परिमाणांची यादी :

मूल्यमापनाचे परिमाण

सविस्तर माहिती

बाह्य व्यवस्थापन पद्धतीशी (आधार) संलग्न करण्याची सुविधा उपलब्ध आहे का?

आधारसारख्या बाह्य व्यवस्थापन पद्धतीशी संबंधित विभाग कशा पद्धतीने जोडला गेला आहे.

मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाशी संलग्न आहे का?

संबंधित विभाग पुणे महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाशी कशाप्रकारे जोडला गेला आहे. प्रशासन विभाग आणि संबंधित विभागामध्ये माहितीची देवाणघेवाण कशाप्रकारे होते.

लेखाशाखेशी संलग्नता

संबंधित विभाग पुणे महानगरपालिकेच्या लेखाशाखेशी कशाप्रकारे जोडला गेला आहे. लेखाशाखा आणि संबंधित विभागामध्ये माहितीची देवाणघेवाण कशाप्रकारे होते.

इतर विभागांशी (नॉन कोअर) संलग्न आहे का? (माहिती अधिकार, लेखापरीक्षण, कामगार विभाग, विधी विभाग)

सेवांचे वितरण करण्यासाठी आणि अन्य कामकाजाशी संबंधित इतर विभागांशी संबंधित विभाग कशाप्रकारे जोडला गेला आहे.

संबंधित इतर बाह्य विभागांशी संलग्न आहे? (जसे की जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख, राज्य शिक्षण विभाग, राज्य आरोग्य विभाग इत्यादी)

संबंधित विभाग इतर बाह्य विभागांशी कशाप्रकारे संलग्न झाला आहे. जसे की भूमि अभिलेख, उच्च न्यायालय इत्यादी विभागांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कशाप्रकारे जोडला गेला आहे.

सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती आणि नवतंत्रज्ञानाचा अवलंब -

विभागांनी निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती आणि नवतंत्रज्ञानाच्या अवलंबासंदर्भातील परिमाणांची यादी :

मूल्यमापनाचे परिमाण

सविस्तर माहिती

विभाग डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम आणि फाईल मॅनेजमेंट सिस्टीम वापरते का?

सध्या कागदपत्रे आणि नस्त्यांचे व्यवस्थापन कशाप्रकारे केले जाते? मानवी हस्तक्षेपाने की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

  • इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करत असल्यास : होय
  • इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करत नसल्यास: नाही

नियोजन आणि अंमलबजावणीसाठी विभाग जीआयएस पद्धती वापरते का?

विभाग भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) पद्धती वापरतो का किंवा भविष्यात वापरणार आहे का

- वापरत असल्यास : होय

- वापरत नसल्यास : नाही

लाभधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी विभाग इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करते का? (जसे की फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप)

जर विभागाचे लाभधारक नागरिक, विभागातील कर्मचारी किंवा बाहेरील संस्थेशी संवाद साधण्यासाठी स्वत:चे स्वतंत्र फेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप ग्रुप किंवा ज्यातून माहितीचा प्रचार आणि प्रसार करता येईल अशी काही इतर माध्यमे आहेत का?

असल्यास : होय

नसल्यास : नाही

विभागातील किती टक्के कर्मचार्‍यांना संगणकाची सुविधा आहे?

गुणोत्तर (संगणकाची सुविधा उपलब्ध असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या) / (एकूण कर्मचार्‍योंची संख्या ) *100

कर्मचारी -

विभागातील माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षित (आयसीटी) कर्मचार्‍यांबद्दलचे परिमाणे

मूल्यमापनाचे परिमाण

सविस्तर माहिती

माहिती तंत्रज्ञान प्राथमिक प्रशिक्षण

माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील प्राथमिक प्रशिक्षित वर्ग १ आणि वर्ग २ संवर्गातील कर्मचार्‍यांची टक्केवारी

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या चाचणीवरून विभागातील प्राथमिक प्रशिक्षित कर्मचार्‍यांची संख्या निश्चित करण्यात येते

माहिती तंत्रज्ञान प्रगत प्रशिक्षण

वर्ग १ आणि वर्ग २ संवर्गातील माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील प्रगत प्रशिक्षित कर्मचार्‍यांची टक्केवारी

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या चाचणीवरून विभागातील प्रगत प्रशिक्षित कर्मचार्‍यांची संख्या निश्चित करण्यात येते.

माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षणातील सहभाग

प्रशिक्षण कार्यक्रमात प्रसिद्ध झालेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमामधील सहभाग

ही संख्या प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांच्या नोंदीवरून ठरविण्यात येईल.

ई-प्रशासनासंदर्भातील विशेष प्रशिक्षण

विभागाच्या ई-प्रशासनासंदर्भातील अॅप्लिकेशन्सवर वर्ग १, २ आणि ३ संवर्गातील किती टक्के कर्मचारी काम करतात?

विभागातील प्रत्येक कामासाठी कशाप्रकारे ई-प्रशासनाचा वापर करण्यात येतो त्यावरून हे प्रमाण ठरविण्यात येईल.