माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

रस्ते देखभाल वाहन

रस्ते रुग्णवाहिका

रस्ते अभियंते आणि कंत्राटदारांना या अॅपद्वारे नागरिकांच्या तक्रारींची कधीही आणि कुठेही नोंद ठेवणे शक्य आहे. तक्रारींबाबतची सूचना त्यांना मोबाईल नोटिफिकेशन किंवा एसएमसद्वारे प्राप्त होते. नागरिकांनाही या अॅप्लिकेशनवरुन आपल्या तक्रारी संबंधित नोंदणीकृत कंत्राटदारापर्यंत पोचविता येतात. त्यानंतर, कंत्राटदाराच्या कामांच्या यादीत या तक्रारींची नोंद होते. याशिवाय, कंत्राटदार आपण पुर्ण केलेल्या कामाचे फोटो काढून या अॅपवर टाकू शकतात व अभियंत्याकडे या कामाची तपासणी करण्याचे काम येते. अभियंते तसेच कंत्राटदारांना या अॅपमार्फत प्रलंबित कामांची यादी मिळविण्यास , तसेच अभियंत्यांना कंत्राटदारांच्या कामावर सहजपणे देखरेख करण्यास मदत मिळते.

शहरभरातील तक्रारींची इत्थंभुत माहिती पाहण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी माहितीफलक उपलब्ध करुन देण्यात येईल. उदाहरणार्थ, तक्रार निवारण झाले का, संबंधित कंत्राटदाराने काम करण्यास सुरुवात केली का इत्यादी