पुणे कनेक्ट

पुणे कनेक्ट

पुणे महानगरपालिकेने पुणेकर व पर्यटकांसाठी विकसित केलेले सर्वसमावेशक मोबाईल अॅप्लिकेशन आहे. या अॅप्लिकेशनमार्फत महानगरपालिकेच्या सेवा, माहिती आणि शहरासंदर्भातील अपडेट्स उपलब्ध करुन दिले जातात. नागरिकांच्या तळहातावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने 'पीएमसी केअर फ्रेमवर्क'अंतर्गत पुणे कनेक्ट या अॅप्लिकेशनची सुरुवात झाली.

PMC MOBILE APP FEATURE

  • पीएमसी केअरः तक्रार नोंदणी व आढावा
  • मालमत्ता करः अॅप्लिकेशनद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा 
  • पाणीपट्टीः ग्राहक क्रमांक टाकून बिले मिळवा, नो ड्यूज तपासणी 
  • आपात्कालीन संपर्कः आपात्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक संपर्क अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत
  • सर्वेक्षणः अॅप्लिकेशनमध्ये नागरिक सर्वेक्षण उपलब्ध. नागरिक पुणे महानगरपालिकेच्या सेवांविषयी अभिप्राय देऊ शकतात. 
  • डिरेक्टरीः पुणे महानगरपालिका कार्यालय डिरेक्टरी अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे.
  • पुणे महानगरपालिकेसंदर्भातील महत्त्वाच्या व्यक्ती व अधिकाऱ्यांविषयी माहिती उपलब्ध 

Contact us

info@punecorporation.org