माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

मिळकत कर सर्व्हेसंदर्भातील मोबाईल आणि वेब अॅप

मिळकत करासंदर्भातील प्रक्रिया स्वयंचलित व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेकडे भौगोलिक स्थानानुसार मिळकत कराचा सर्व्हे करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामागे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रत्येक घराच्या भौगोलिक स्थानानुसार मिळकत कराची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित करणे ही दूरदृष्टी आहे. `बेंचमार्क आयटी’ यांच्याकडे मिळकत कराच्या सर्व्हेच्या मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्याच्या कामासाठी नेमणूक झाली आहे. हे मोबाईल अॅप कोणत्याही ब्राऊजरवर, कोणत्याही संगणकीय प्रणालींना अनुकूल आहे. याशिवाय वेब अॅप्लिकेशनही उपलब्ध आहे.

या कामामध्ये खालील बाबींचा समावेश होतो -

  • हातात धरता येण्याजोग्या डिव्हाईसद्वारे सर्व्हेक्षकाला या मोबाईल अॅपद्वारे भौगोलिक स्थानाची अचूक आणि प्रभावी अशी माहिती संकलित करता येणार आहे.
  • पुणे महानगरपालिकेच्या गरजेप्रमाणे क्षेत्रासंबंधीची माहिती भरण्यची सुविधा उपलब्ध
  • बांधकाम सुरू असलेल्या किंवा अपूर्ण बांधकाम असलेल्या मिळकतींची स्वतंत्र माहिती भरण्याची सुविधा
  • जिओ-टॅग्ड आणि जिओ-कंट्रोल्ड टाईमस्टॅम्पसह इमातींचे छायाचित्र घेण्याची सुविधा
  • किती अंतरावरून इमारतींचे छायाचित्र घ्यायचे आहे हे पुणे महानगरपालिकेने निश्चित करेल. तेवढ्याच अंतरावरून इमारतींचे छायाचित्र काढून ते अटॅच करण्याची सुविधा
  • सर्व्हेक्षकाला डिव्हाईसच्या गॅलरीतील छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा नसेल. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणांच्या परवाना देण्यात आलेल्या परिसरातील छायाचित्रच अपलोड करावे लागेल.
  • सर्व्हेक्षकाला अत्यंत सुलभ अशा डॅशबोर्डची सुविधा आहे. त्यामुळे त्याने लॉग-इन केल्यानंतर त्याला आजूबाजूच्या सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या इमारती, सर्व्हेक्षण पूर्ण न झालेल्या इमारती आणि काम सुरू असलेल्या इमारतींबद्दल माहिती मिळेल.
  • मिळकतीची ठिकाणे दाखविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने निश्चित केलेल्या रेषांच्या खुणा आणि रंग असावेत.
  • सर्व्हेक्षकाने माहिती संकलित केल्यानंतर त्याला सर्व्हेक्षणाच्या ठिकाणावरून माहिती भरण्याची सुविधा आहे.
  • सर्व्हेक्षकाला ज्या परिसराची परवानगी मिळाली आहे त्या परिसरासह प्रतिबंध असलेल्या मिळकतीबाबतची माहिती घेऊ शकतो.

मिळकत क्रमांकानुसार मिळकतींचा शोध घेण्याची सुविधा सर्व्हेक्षकाला देण्यात आली आहे.

अॅपमध्ये नव्या मिळकतीची माहिती नोंदविणे, क्रमांक आणि अक्षरांचा समावेश असलेल्या जीआयएस आयडीची नोंदणी, मिळकतीची प्राथमिक माहिती यासह अन्य सुविधा उपलब्ध आहेत.

लिंक्स: