माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

पीएमसी पोर्टल

पीएमसी पोर्टल हे पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.punecorporation.org ची अद्ययावत आवृत्ती आहे. पुणे शहराप्रमाणेच हे पोर्टल रंगबेरंगी, व्हायब्रंट आणि पर्यटकांच्यादृष्टीने अनुकूल आहे. ड्रुपल कंन्टेट मॅनेजमेंट प्रणालीमध्ये तयार करण्यात आलेले हे पोर्टल नागरिकांसाठी प्रशासनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे व्यासपीठ आहे. नागरिक लॉगिन करुन येथे स्वतःची नोंदणी करून आपल्या महापालिकेबाबतची सर्व माहिती आपल्या स्मार्टफोनवर मिळवू शकतात.

नागरिकांना या पोर्टलमध्ये स्वतःचं स्वतंत्र प्रोफाईल करण्याचादेखील पर्याय उपलब्ध आहे. त्यांना येथे स्वतःचे फोटो अपलोड करता येतील तसेच महापालिकेतील आवडीच्या विभागांसंबंधी नोटिफिकेशन्स किंवा बातम्या त्वरित मिळण्याची सोय करुन घेता येईल. त्याचप्रमाणे, जीआर, टॅक्सेस आणि शासकीय धोरणे, नकाशे, प्रकल्पांचे अहवाल, सरकारी प्रक्रिया फॉर्म आणि परिपत्रकांसारखी सार्वजनिक माहिती डाऊनलोड करता येईल. पुणे महानगरपालिकेचे सर्व विभाग, त्यांची रचना आणि कार्यपद्धती, संबंधित व्यक्ती आणि सेवा याविषयीची सर्व माहिती नागरिकांसाठी खुली असून ती या पोर्टलवर उपलब्ध आहे. नकाशासह उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्च फंक्शनमुळे नागरिकांना हवी ती माहिती सहजरित्या पाहता येते.

याशिवाय, नागरिकांना महानगरपालिकेच्या कक्षेतील सर्व संकेतस्थळांची देखभाल करता येईल. यासाठी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची मदत घेण्याची गरज नाही. यामुळे, सार्वजनिक माहिती लवकरात लवकर उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.

नागरिक स्वतः एखादं निमंत्रण तयार करुन ठराविक समुहांना पाठवू शकतात. यामध्ये महापालिकेचे कर्मचारी आणि किंवा सामान्य लोकांचा समावेश असू शकतो. निमंत्रितांनादेखील आपल्या वैयक्तिक कॅलेंडरमध्ये ही माहिती साठवता येऊ शकते.

पीएमसी पोर्टलशी संलग्न अॅपदेखील लवकर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. संकेतस्थळावरील माहिती व्यवस्थापन वैशिष्ट्यासोबतच नागरिकांना इव्हेंट्स, बातम्या, नोकरभरती आणि याविषयीची नवी माहिती तसेच विभागाविषयीची नवी माहिती मिळू शकते.