माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

ओपन डेटा

ओपन डेटा उपक्रम:

पुणे महानगरपालिकेच्या कामकाजादरम्यान दररोज मोठ्या प्रमाणातील माहिती तयार होत असते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरील माहिती नागरिक, नागरी संस्थांना पाहता येत नाही. संवेदशील नसलेली माहिती नागरिकांना विविध सामाजिक, आर्थिक, विकासाच्या कामांसाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची माहिती नागरिकांना वापरण्यासाठी, पुनर्वापरासाठी आणि पुनर्वितरणासाठी खुली असणे गरजेचे आहे. कोणत्याही परवान्याशिवाय किंवा नियंत्रणाच्या यंत्रणेशिवाय ही माहिती नागरिकांना प्राप्त व्हायला हवी. शासनाची माहिती खुल्या पद्धतीने (ओपन फॉरमॅट) उपलब्ध झाल्याने नागरिकांना सहभागी करून घेताना पारदर्शकता आणि जबाबदारीला प्रोत्साहन मिळते.

पुणे डेटास्टोअरने http://opendata.punecorporation.org/ येथे ओपन फॉरमॅटमधील एकत्रित माहिती विभागनिहाय उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी माहिती शोधण्याची आणि माहिती तातडीने पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांच्या सहभागासाठीही पुणे डेटोस्टोअर येथे सुव्यवस्थित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पुणे डेटास्टोअरमधील माहिती साठविण्यासाठी सक्षम बॅकएंड व्यवस्था उभारण्यात आली आहे. पूर्वनियोजित कार्यपद्धतीनुसार पुणे महानगरपालिकेतील विविध विभाग त्यांच्याकडील डेटासेटस (माहिती) प्रकाशित करतात. याशिवाय विविध विभागांना अपलोड केलेली माहिती पाहण्यासाठी, माहिती वापरलेल्या केलेल्या युजर्सच्या माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच त्यासंदर्भात नागरिकांकडून आलेल्या प्रतिक्रिया आणि प्रश्ने पाहण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहेत.