माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

ऑफिस कनेक्ट

नागरिकांनी महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी `पुणे कनेक्ट' अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत -

  • पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना लॉग-इनची सुविधा. तसेच निवारणासाठी त्यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारी पाहण्याची सुविधा
  • विभागप्रमुखांना विभागामध्ये आलेल्या तक्रारींची संख्या डॅशबोर्डद्वारे पाहण्याची सोय.
  • केवळ कार्यालयातूनच नव्हे तर मोबाईलद्वारे कोणत्याही ठिकाणावरून कर्मचार्‍यांकडे निवारणासाठी आलेल्या तक्रारींवर उत्तर देण्याची सुविधा
  • तातडीच्या वेळी रुग्णालये, अग्निशामक दल, सार्वजनिक स्थळे आदी ठिकाणी तातडीचा दूरध्वनी करण्याची सुविधा
  • सार्वजनिक शौचालये, शाळा, रुग्णालये, मनोरंजन केंद्रे आदींची माहिती असलेला पुणे महानगरपालिका क्षेत्राचा नकाशा पाहण्याची सुविधा.
  • राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध संकेतस्थळांच्या आणि सोशल मिडिया हॅण्डल्सच्या लिंक्स
  • विविध विभागांच्या प्रमुखांचे संपर्क क्रमांक पाहण्याची सुविधा
  • सेवेचा अधिकार कायद्यांतर्गत परवाना आणि प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या ४० सेवांची स्थिती पाहण्याची सुविधा