लाईट हाऊस प्रकल्प

पुणे महानगरपालिकेच्या लाईट हाऊस प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा पुण्यातील वंचित तरुणांना त्यांची कौशल्ये विकसित करुन अर्थपूर्ण करियरच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करणे हा आहे.

राहणीमान आणि कौशल्य सुधारणा- सामाजिक गरज:

मुबलक प्रमाणात उपलब्ध कार्यक्षम, लवचिक आणि पात्र मनुष्यबळामुळे भारत एक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कीर्ती टिकवून ठेवण्यासाठी या मनुष्यबळाचा विकास आणि सक्षमीकरण गरजेचे आहे. दुर्दैवाने, इतर देशांच्या तुलनेत भारत प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत मागे आहे. देशातील एकुण कर्मचारी संख्येपैकी(वर्कफोर्स) केवळ १० टक्के मनुष्यबळास कौशल्यांचे प्रशिक्षण( २ टक्के औपचारिक तर ८ टक्के अनौपचारिक प्रशिक्षण) दिले जाते. तसेच कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. एकीकडे शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर दिला जात असतानादेखील अर्थव्यवस्थेच्या वाढत्या मागण्या पुरविण्यासाठी कौशल्यवान मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.      

फाऊंडेशन कोर्सः चांगली सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखेच आहे: 

जेव्हा आपण भविष्यकाळाच्या दिशेने प्रवासाचा विचार करतो तेव्हा ही म्हण सार्थ ठरते. परंतु, समाजातील बरेचसे वंचित तरुण गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत उदरनिर्वाहाच्या पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात करतात. सहसा अपुरा आत्मविश्वास हे त्यामागील प्रमुख कारण ठरते. यामुळे केवळ दैनंदिन गरजा भागविणारे उत्पन्न उपलब्ध करुन देणारी उपजीविका ते स्वीकारतात.      

म्हणूनच तरुणांमधील ‘एजन्सी’ जागृत करुन त्यांना प्रेरणा देण्यासाठी लाईटहाऊस येथे फाऊंडेशन कोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. स्वतःमध्ये ‘एजन्सी’ जागृत करणे म्हणजे स्वतःचे भविष्य घडविण्याची वैयक्तिक क्षमता असणे. यामध्ये मानवी क्षमतांचा विकास आणि प्रतिबिंब, ऐकण्याचे कौशल्य, सहानुभूती, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची शक्ती इ. गुणांचा विकास समाविष्ट आहे.   

समुपदेशन आणि बाजारपेठ संशोधन:

लाईटहाऊस येथे समुपदेशक तरुणांमधील कलागुण विकसित करुन त्यांना उपजीविकेची साधनं शोधण्यास मदत केली जाते. उदाहरणार्थ, एखादा युवक जर वाहन क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असेल तर तो त्याची नैसर्गिक कौशल्ये योग्य कामासाठी वापरुन कार मेकॅनिक होऊ शकतो आणि काही काळानंतर स्वतःचे गॅरेजदेखील सुरु करु शकतो. समुपदेशक आणि या मुलामार्फत त्याची आवड, प्रतिभा, बुद्धिमत्ता, आयुष्यातील परिस्थिती आणि नोकरीच्या संधी या सगळ्याची सांगड कशी घालता येईल याचा प्रयत्न केला जाईल.   तरुण/तरुणी त्यांच्या आवडीच्या व्यवसायात स्वयंसेवक म्हणून काम करुन पाहू शकतात आणि त्यात आणखी पुढे काम करायचे की नाही हे ठरवू शकतात. जर त्यांना हे काम आवडले नाही तर  ते इतर संधींचा लाभ घेऊ शकतात. लाईटहाऊस येथे प्रत्येकाला आपली कौशल्ये संपुर्णपणे विकसित करुन स्वतःचा शोध घेण्याची संधी दिली जाईल.  

कौशल्य प्रशिक्षण:
एकदा तरुण/तरुणीने आपले आवडीचे क्षेत्र निवडले की पुढच्या टप्पा म्हणजे आवश्यक कौशल्ये विकसित करणे किंवा त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणे. त्यांच्यासाठी होम-शेफ आणि नर्सिंगपासून आयटी कौशल्ये आणि इतर रोजगाराशी संबंधित कोर्सेसचा समावेश आहे. 

शिक्षण संस्कृती:
संपूर्ण कार्यक्रमाची अशा पद्धतीने रचना केली जाते की सहभागी प्रशिक्षणार्थींमध्ये स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेची भावना निर्माण होईल आणि त्यांना अधिक सहज पद्धतीने त्यांची आवड आणि सक्षम गुण शोधता येतील. 

इंटर्नशिप आणि प्लेसमेंटः 

रोजगार/उद्योजकता/ उच्चशिक्षणाची कास 

तरुणांना नोकरी मिळविण्यासाठी तसेच सहकारी विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेशाकरिता मदत केली जाते. लाईटहाऊसमध्ये एखादा अभ्यासक्रम पुर्ण करुन एखादा व्यवसाय सुरु करणाऱ्या किंवा उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांना जर पुन्हा एखादे कौशल्य सुधारण्यासाठी किंवा नवे कौशल्य आत्मसात करण्यासाठी केव्हाही परत यायचे आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. सातत्याने काहीतरी नवे शिकण्याची सवय रुजविणे हा मुख्य उद्देश आहे. 

शिक्षणकेंद्रीत अध्यापनशास्त्र- आजीवन शिकत राहण्याची मानसिकता रुजविणे 

  1.  मार्गदर्शन आणि प्रबोधन 
  2.  तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वावलंबी शिक्षण 
  3.  समवयस्कांकडून शिक्षण-  टीम आधारित प्रकल्प, आव्हाने
  4.  कौशल्यांवर प्रभुत्व- कठोर मेहनत, फोकस,  सराव
  5.  अनुभवासह शिक्षण - कौशल्य आणि संकल्पनांचा वापर, प्रतिबिंब, कृती


स्किल्स मार्केटप्लेस( बाजारपेठेसंबंधीचे ऑनलाईन पोर्टल) 

स्किल मार्केटप्लेस हे एक पोर्टल आहे ज्यावर सर्वांना आपल्या विशेष कौशल्यांचे मार्केटिंग करण्याची संधी मिळेल. उदाहरणार्थ, शहरातील प्लंबर, सुतार, स्वयंपाकी आणि इतर कुशल कामगारांना या पोर्टलवरुन आपल्या सेवांची जाहिरात करता येईल. {युवक आपल्या सेवांची स्किल्स मार्केटप्लेसवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.  स्किल्स मार्केटप्लेसमार्फत सेवा पुरवठादार आणि ज्यांना सेवांची गरज आहे असे लोक एकमेकांशी जोडले जातात.}

लाईटहाऊस उपक्रमांचा दीर्घकालीन प्रभाव  
समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करुन समाजात व्यापक प्रमाणात परिवर्तन घडवून आणणे 

कौशल्यवान आणि सक्षम तरुणाईचा बाजारपेठेत प्रवेश झाल्याने आर्थिक वाढीस चालना 

तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक ध्येय साध्य करण्याची जबाबदारी घेणे 

वर्ष २०१६-१८ दरम्यान साध्य करावयाची उद्दिष्टे

  • मार्च २०१७ पर्यंत पुणे शहरात ५ लाईटहाऊस केंद्रे उभारणे. मार्च २०१८ पर्यंत पुणे शहरातील प्रत्येक प्रभागात लाईटहाऊस असेल.
  • प्रत्येक लाईटहाऊसमार्फत तीन ते चार झोपडपट्टी समुदायांना मार्गदर्शन केले जाईल 
  • मार्च २०१८ पर्यंत प्रत्येक लाईटहाऊसमध्ये किमान १००० युवकांची नोंदणी करणे 
  • स्किल्स मार्केटप्लेस पोर्टल विकसित करणे