कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

कायदेशीर उपक्रम

कामगार कायद्याची अंमलबजावणी

  • पुणे महानगरपालिकेमधील विविध विकास आणि देखभालीच्या कामांसाठी कंत्राटदारामार्फत कामगारांच्या सेवा घेतल्या जातात. या कार्यालयामार्फत ही सर्व कामे कामगार आणि औद्योगिक कायद्याच्या नियमावलीनुसार केली जातात का हे
  • पाहिले जाते. किमान वेतन कायदा १९४८ कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र सरकारने किमान वेतन निश्चित केले आहे. या बाबीसाठी तात्पुरत्या १५ उप कामगार अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उप कामगार अधिकार्‍यांमार्फत
  • कंत्राटी कामगारांच्या संदर्भात सहजपणे समन्वय साधला जातो. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत कामगार अदालतीचे आयोजन केले जाते. 

नियुक्तींची तपासणी
मा. लाड आणि पागे समितीने सफाई कामगार आणि कचरा वेचकांच्या निवृत्तीनंतर किंवा निधनानंतर किंवा अपंगामुळे घेतलेल्या निवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना सेवेत घेण्याची शिफारस केली आहे. या संदर्भातील सर्व नियुक्तींची प्रकरणे या विभागामार्फत तपासली जातात.