कामगार कल्याण विभागप्रमुखांचे मनोगत

पुणे महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागाचा मुख्य उद्देश महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी विविध कामगार कल्याण योजना राबविणे, विविध कामगार आणि औद्योगिक कायद्यातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६६ मधील तरतुदीनुसार प्रशासन आणि कामगार यांच्यामध्ये समन्वय साधून औद्योगिक शांतता राखण्यात आमच्या विभागाची महत्वाची भूमिका आहे.

कामगार कल्याण विभागामार्फत महापालिका कर्मचाऱ्यांना कामगार कल्याण निधी, कामगार प्रशिक्षण वर्ग, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कल्याणकारी योजना पुरविल्या जातात. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्त/मयत सेवकांच्या कायदेशीर वारसास नियुक्ती प्रकरणांची विभागामार्फत छाननी केली जाते. त्याचप्रमाणे, जादा कामाचे वेतन प्रकरणी छाननी करणे, कामगार आणि औद्योगिक न्यायालयातील दाखल दाव्यांप्रकरणी समन्वय साधणे ही कामेदेखील विभागामार्फत पार पाडली जातात. मराठी भाषा संवर्धन समितीमार्फत मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन पुणेकर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते.  कर्मचाऱ्याच्या तक्रारींचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचा आमच्या विभागामार्फत  कसोशिने प्रयत्न केला जातो.
    
पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. भविष्यात आम्ही पुढील योजना राबविणार आहोत:

  1. मनुष्यबळ विकास कक्ष विस्तारित करणे
  2. परिणामकारक आणि गरजेनुरुप प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण करणे
  3. कामगार कल्याण निधी भवन उभारणी करणे
  4. केंद्रीय वेतन विभागाची निर्मिती करणे.
  5. महिला कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी योगा, क्रीडा आणि फिटनेस प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे.

श्री. शिवाजी दौंडकर
मुख्य कामगार अधिकारी
पुणे महानगरपालिका