• स्लाइडर १

  पुणे महानगरपालिकेने स्वत:ची प्रशिक्षण अकादमीची स्थापना केली आहे. या माध्यमातून कर्मचार्‍यांचे गुण...

  अधिक वाचा
 • स्लाइडर २

  पुणे महानगरपालिकेच्या मनुष्यबळ विकास यंत्रणा स्वयंचलित करणे.

  अधिक वाचा
 • स्लाइडर ३

  कर्मचार्‍यांचे प्रकार आणि सेवांचे वर्गीकरण

  अधिक वाचा

Quick Links

Overview & Functioning

सामान्य प्रशासन खात्याविषयी

सामान्य प्रशासन हे पुणे महानगरपालिकेतील एक महत्वाचे खाते आहे. या खात्यामार्फत मनपातील सर्व खात्यांचे बाबतीत प्रशासकीय समन्वय व मा. महापालिका आयुक्त यांचेकडून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या आदेशांनुसार व त्यांचे मान्यतेने प्रशासकीय नियंत्रणाचे काम केले जाते. याच बरोबर सर्व खात्यांना सरळसेवा भरतीद्वारे व पदोन्नतीद्वारे विविध पदांसाठी मनुष्यबळ पुरविण्याचे काम केले जाते. पुणे महानगरपालिकेतील सर्व प्रकारच्या सेवेत जसे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी आणि तांत्रिक सेवा,वैद्यकीय/ निमवैद्यकीय सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा, विधी सेवा, अग्रिशमन सेवा यांमध्येकार्यरत सुमारे सतरा हजार अधिकारी/ कर्मचार्‍यांचे सेवा अभिलेखे/ सेवा तपशीलाची विविध मुद्यांवरील माहिती अद्ययावत ठेवणे. सदर सेवांमधील वेळोवेळी रिक्त होणारी पदे/ नवनिर्मित पदे विहित केलेली भरती प्रक्रीया राबवून सरळसेवा भरतीद्वारे भरणे. जी पदे पदोन्नतीची आहेत त्या पदांवर विहित कार्यपध्दतीने सेवाज्येष्ठता व आरक्षणानुसार पात्र अधिकारी/ कर्मचार्‍यांमधुन पदोन्नतीने नियुक्त्या करणे.

उप आयुक्त (सामान्य प्रशासन) यांचे नियंत्रणाखाली खातेप्रमुख म्हणून खालील विभागांचा स्वतंत्रपणे कार्यभार सोपविण्यात आला आहे.

 • सामान्य प्रशासन विभाग
 • आस्थापना विभाग
 • माहिती व जनसंपर्क विभाग
 • खातेनिहाय चौकशी विभाग
 • देणगी विभाग
 • प्रशासकीय सुधारणा (Administrative Reforms) 
 • अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण

पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमास व आकृतीबंधास शासनाने सन 2014 मध्ये मंजूरी दिली आहे. सेवाप्रवेश नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची आहे. या नियमांच्या अंमलबजावणीचे काम हाती घेण्यात आले असुन शासन निर्णयानुसार पदनामातील बदल तसेच खात्यांच्या नावामध्ये बदल करण्यात आले असुन नव्याने उपलब्ध झालेल्या विभागानुसार मनपा प्रशासनाची रचना करुन त्याप्रमाणे खातेप्रमुखांना जबाबदारी सोपविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सेवाप्रवेश नियमास मंजूरी मिळाल्याने सरळसेवा भरती व पदोन्नतीबाबत सदर नियमांत सुस्पष्ट तरतुदी करण्यात आल्या असल्या तरी शासनाने 3877 नवीन पदांना मंजूरी दिली असल्याने त्याची अंमलबजावणी व त्यासाठीचे अर्थसंकल्पीय तरतुद या सर्व गोष्टींची सांगड घालून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे मोठे आव्हानात्मक काम या विभागापुढे आहे. खात्यांच्या कामाची निकड व त्यानुसार त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ विचारात घेऊन अर्थसंकल्पात तरतुद करुन टप्प्याटप्प्याने नवनिर्मित पदे भरण्याचा खात्याचा मानस आहे. महापालिकेतील सर्व  अधिकारी / कर्मचाऱयांचे (सुमारे 16500 कर्मचा-याची ) सेवा तपशीलाची माहिती संगणकीकृत (DIGITALIZE) करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. माहे जानेवारी 2017 अखेर सादर काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी / कर्मचा-यांची सरळसेवेने भरती करताना जास्तीत जास्त नागरिकांना माहिती मिळण्याकरीता महानगरपालिकेच्या वेबसाईटवर व् स्थानिक वर्तमानपत्रात भरती जाहिरात प्रसिध्द करणे. ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविने व जाहिरातीनुसार पात्र व अपात्र ठरलेल्या अर्जाचा तपशील,परिक्षेचा निकाल, निवडयादी, प्रसिध्द करण

Array

विभाग माहिती

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री अनिल मुळे

पदनाम: उप आयुक्त (सामान्य प्रशासन)

ई-मेल आयडी: anil.muley@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 8424050847

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. प्रशांत चव्हाण

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी: prashant.chavan@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9822076099

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमाती. अश्विनी जागडे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 20 25501123

विभागाची माहिती

विभाग पत्ता: उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विभाग पुणे महानगरपालिका खोली क्र. 234, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे 411005

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: dmcgeneral@punecorporation.org

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री अनिल मुळे

पदनाम: उप आयुक्त (सामान्य प्रशासन)

ई-मेल आयडी: anil.muley@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 8424050847

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. प्रशांत चव्हाण

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी: prashant.chavan@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9822076099

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमाती. अश्विनी जागडे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 20 25501123

विभागाची माहिती

विभाग पत्ता: उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विभाग पुणे महानगरपालिका खोली क्र. 234, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे 411005

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: dmcgeneral@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents
image