Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून प्रामुख्याने महानगरपालिकेतील सार्वजनिक ठिकाणी असणार्या विद्युत यंत्रणेच्या व्यवस्थापनाचे कामकाज पाहिले जाते. शहरात कार्यक्षम विद्युत यंत्रणा बसविणे, सार्वजनिक विद्युत यंत्रणेचा विशिष्ट दर्जा निर्माण करणे , वाहन आणि पादचारी सुरक्षेसाठी रस्त्यांवर योग्य प्रकाशव्यवस्था निर्माण करणे आणि एलईडी दिवे व सौर उर्जा वापर करून वीज बचत करण्यावर विभागाचा अधिक भर आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९,चे प्रकरण ६ मधील कलम ६३(७)(१८)(१९), ६६, २४९, २५१ व २५२ नुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रकाश व्यवस्था पाहिली जाते. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांवर दिव्यांची सोय करणे, मनपा भवन ,सांस्कृतिक भवने, नाट्यगृहे, शाळा, उद्याने, स्मशानभूमी, मनपा दवाखाने व हॉस्पीटल्स, मनपा चाळी या सर्व ठिकाणी प्रकाश व्यवस्था व देखभाल दुरूस्ती व विद्युत प्रकल्पाच्या कामांचा समावेश असतो. याबरोबरच गणपती उत्सवात घाटावरील प्रकाश व्यवस्था व विविध कार्यक्रमाकरिता लागणारी तात्पुरती प्रकाश व्यवस्था,ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था विद्युत विभागामार्फत केली जाते.

पुणे मनपाच्या विविध इमारतींमध्ये, उद्यानांमध्ये  व रस्त्यांवर करावयाची प्रकल्पविषयक कामे मुख्य खात्यांमार्फत केली जातात. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रकाश व्यवस्था, म्युझिकल फाउंटन्स उभारणी, नव्याने कार्यान्वित करण्यात येणार्या पुणे मनपाच्या ई लर्निंग स्कूल्समध्ये विद्युत व्यवस्था करणे. पुणे मनपाच्या नव्याने कार्यान्वित होणार्या विविध सांस्कृतिक भवने व कलादालनामध्ये  वातानुकूलित यंत्रणा उभारणी, साउंड सिस्टिम, लिफ्ट उभारणी इ. सर्व विद्युत कामे करणे. मनपाच्या  स्मशानभुमींमध्ये  गॅस व डिझेल शवदाहिन्या बसविणे,  वुडपायर यंत्रणा बसविणे यासारखी वैशिष्ट्यपूर्ण  कामे करणे. तसेच उर्जा बचत, पर्यावरणपूरक दृष्टीकोन व अपारंपारीक उर्जा स्त्रोत वापरण्यावर भर देण्यासाठी उद्यानांमध्ये सोलर दिवे बसविणे, सोलर वॉटर हिटर बसविणे, एल.ई.डी.फिटींग बसविणे, विविध इमारतीमधील एनर्जी ऑडिट करून घेणे, जी.आय.एस.सिस्टिम राबविणे, इत्यादी प्रकल्प उपलब्ध आर्थिक तरतूदीनुसार  राबविले जातात.  उभारलेल्या संपूर्ण विद्युत यंत्रणेसाठी येणा-या वीज खर्चासाठी म.रा.वि.कं. लि. कडून प्राप्त बीले अदा करण्याबाबतची  कार्यवाही करण्यात येते.

विभाग माहिती

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. श्रीनिवास कंदूल

पदनाम: मुख्य अभियंता

ई-मेल आयडी: skandul@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931374

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. प्रशांत काथवटे

पदनाम: उप अभियंता

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689931410

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. मर्यादा गुळवे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689631862

विभागाची माहिती

विभाग पत्ता: मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे - ५.

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: electric@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents
image