दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. २९ जुलै २०१९ ते दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. 

विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जांची प्रिंट आऊट आणि सोबत आवश्यक त्या कागदपत्रांसहित (कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा) आपल्या जवळच्या क्षेत्रिय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दि. १ ऑगस्ट २०१९ ते दि. ५ डिसेंबर २०१९ पर्यंत सकाळी १० .३० ते दुपारी ०४.०० या वेळेत स्विकारले जातील.

 


काय आहे योजना? किती मिळणार मदत?
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयोंची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.
 

 


​योजनेसाठीची पात्रता

  • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
     
  • या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण आवश्यक.
  • पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण आवश्यक.
     
  • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.
     
  • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थत प्रवेश घेतलेला असावा.
     


 

अधिक माहितीसाठी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.