माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select OVERVIEW & FUNCTIONING

सिटी डिजिटल स्ट्रॅटेजी

पुणे महानगरपालिकेने शहराला ख-या अर्थाने डिजीटल बनविण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठीचे शहराचे डिजीटल धोरण अर्थात `सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी' तयार केली आहे. या धोरणामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाधिक सेवा-सुविधा नागरिकांपर्यंत डिजीटल माध्यमातून सुलभपणे पोहोचविण्यासाठी तसेच त्यासाठी उभारण्यात येणा-या आवश्यक त्या पायाभूत सुविधा, आवश्यक ते प्रशासकीय प्रक्रियेतील बदलांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच पुढील तीन वर्षांमध्ये शहरात कोणकोणते तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, याबाबतही धोरणामध्ये भाष्य करण्यात आले आहे. हे धोरण म्हणजे पुणे महानगरपालिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीचे दिशादर्शक आहे.