सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमानही अधिक सुकर होत चालले आहे. प्रशासनालाही या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे. त्यामुळे प्रशासनही आपल्या सेवा-सुविधांचे प्रभावीपणे वितरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहराला ख-या अर्थाने डिजीटल बनविण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठीचे शहराचे डिजीटल धोरण अर्थात `सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी' तयार केली आहे.  

या धोरणामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाधिक सेवा-सुविधा नागरिकांपर्यंत डिजीटल माध्यमातून सुलभपणे पोहोचविण्यासाठी तसेच त्यासाठी उभारण्यात येणा-या आवश्यक त्या पायाभूत सुविधा, आवश्यक ते प्रशासकीय प्रक्रियेतील बदलांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच पुढील तीन वर्षांमध्ये शहरात कोणकोणते तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, याबाबतही धोरणामध्ये भाष्य करण्यात आले आहे. हे धोरण म्हणजे पुणे महानगरपालिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीचे दिशादर्शक आहे.

सिटी डिजिटल स्ट्रॅटेजी वाचण्यासाठी येथे क्लिक करा