माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

क्षमता बांधणी

व्यवस्थापनातील बदल प्रक्रियेमध्ये क्षमता बांधणी हा एक महत्वाचा उपक्रम आहे. माहिती तंत्रज्ञानासंबंधातील विविध उपक्रमांची अंमलबजावणी करताना त्यासठी संबंधित लोक तयार असणे अत्यंत आवश्यक असते. क्षमता बांधणीद्वारे बदलाचे व्यवस्थापन आणि सक्षम बदल करण्यासाठी अशा उपक्रमांसाठी लोकांना तयार केले जाते. संस्थात्मक व्यवस्थेद्वारे क्षमता बांधणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश असतो –

  • बदल व्यवस्थापन आणि क्षमता बांधणी संदर्भात सल्लागारांची नियुक्ती
  • पुणे महानगरपालिकेच्या स्तरावर अंतर्गत क्षमता बांधणी टीमची नियुक्ती
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती असणारे, विभागीय स्तरावरील माहिती तंत्रज्ञानाचे नोडल अधिकारी यांच्यामधून क्षमता बांधणीचे एजंट/प्रशिक्षकांची नियुक्ती करणे
  • लाभधारक नागरिकांमधून आणि नगरसेवकांमधून क्षमता बांधणीची टीम तयार करणे
  • प्रशिक्षण कक्ष विकसित करणे
  • प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे

पुणे महानगरपालिकेमध्ये स्मार्ट प्रशासन आणण्यासाठी कर्मचार्‍यांनी नव्या भूमिका पार पाडणे आणि नवी कौशल्ये आत्मसात करावे लागते.

प्रशिक्षण कार्यक्रम

पुणेकरांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी पुणे महनगरपालिकेने स्मार्ट सिटीची संकल्पनेकडे वाटचाल केली असून त्यातून नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या पार्श्वूमीवर पुणे महानगरपालिकेने विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नागरी सुविधा केंद्र (सीएफसी), संकेतस्थळ आणि पोर्टल्स, मोबाईल अॅप्स यासारखी विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत.

पुणे महानगरपालिकेने पोर्टल आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून

संगणक, लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स आणि टॅब्लेटस अशा डिव्हाईसेसद्वारे महानगरपालिकेच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या सेवा पारंपरिक पद्धतीने आणि प्रत्यक्ष भेट देऊन वापरण्याच्या पद्धतीला पर्याय मिळाला आहे. यातून पुणे महानगरपालिकेतील कामकाजात पारदर्शकता आणि सेवांच्या वितरणामधील कार्यक्षमता वाढली आहे.

प्रशिक्षण आणि मूल्यांकन मॉड्युमध्ये युजर मॅनेजमेंट मोड्युल, ऑनलाईन वाचन साहित्य मोड्युल, अहवाल आणि डॅशबोर्ड या सर्वांचा समावेश आहे. या मोड्युलचा वापर करून पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. तसेच ऑफलाईन ट्रेनिंगचे नियोजनही करू शकतात. या मोड्युलच्या माध्यमातून प्रशिक्षणात घेतलेल्या कर्मचार्‍याला त्यांचा गुणवत्ता आणि रिपोर्ट कार्ड पाहता येऊ शकते.

प्रशिक्षण कार्यक्रम खालील मुद्यांवर आधारित आहे

ई प्रशासनातील संकल्पना आणि स्मार्ट प्रशासनातील उपक्रम वापरण्याबाबत कर्मचार्‍यांमध्ये जागृती आणि संवेदनशीलता निर्माण करते.

ज्ञानवृद्धी – स्मार्ट प्रशासन आणि ई-प्रशासनाशी संबंधित विविध तंत्रज्ञान आत्मसात करणे

कौशल्यवृद्धी – माहिती तंत्रज्ञान आणि स्मार्ट प्रशासनाचे कौशल्ये शिकणे

बळकटीकरण – ज्ञान आणि कौशल्ये अद्ययावत करणे

प्रशिक्षण पद्धती

  • वर्गखोल्यांतील प्रशिक्षण – जागृती / संवेदनशीलता निर्माण करणे
  • प्रयोगशाळेतील प्रशिक्षण – ज्ञान आणि कौशल्यांचा विकास
  • ई-लर्नर्स – बळकटीकरण आणि विकासाचे प्रमाणीकरण
  • बाह्य प्रशिक्षण – बदल व्यवस्थापन, संस्कृती विकास, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण