माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

कॉल सेंटर

कॉल सेंटर विनामूल्य मदत क्रमांक १८०० १०३० २२२

नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी आणि पुणे शहराला स्मार्ट पुणे करण्यासाठी कॉल सेंटरची महत्वाची भूमिका आहे. खालील लाभधारकांसाठी कॉल सेंटर एक व्यासपीठ म्हणून काम करते.

नागरिक

अधिकारी

समुदाय

फेसबुक, एसएमएस, ईमेल, ट्विटर, लोकशाही, झेड+ याशिवाय नागरिकांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठीचे माध्यम

प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अधिकार्‍याकडे पाठविण्यात येतात. संबंधित अधिकारी विहित कालावधीत तक्रारीचे निराकरण करतात आणि त्याबाबत माहिती देतात

 

नागरिकांच्या सहभागासाठीचे व्यासपीठ

 

विनामूल्य क्रमांक – नागरिकांनी केवळ विनामूल्य क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर एजंट त्यांना आवश्यक ते सहकार्य करेल.

अभिप्रायांचे संकलन आणि त्याचे विश्लेषण – प्रत्येक तक्रारीचे विहित कालावधीत निराकरण झाले आहे का हे नागरिकाकडून जाणून घेणे. त्यासाठी १ ते ५ अशा रेटिंग स्वरुपात अभिप्राय नोंदविणे. १ म्हणजे सर्वांत कमी दर्जाची सेवा. तर ५ म्हणजे सर्वोत्कृष्ट. सरासरी रेटिंगपेक्षा कमी रेटिंग आलेल्या सर्व तक्रारींचा पाठपुरावा करून संबंधित विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवांमध्ये सुधारणा करणे

 

शिक्षण, संवेदनशीलता जागृतीबाबत मोहिम – कॉल सेंटरचा उपयोग माहितीचा प्रसार, जनजागृती आणि शिक्षणासाठीही करण्यात येतो.

 

तांत्रिक आणि अतांत्रिक फोनद्वारे सहकार्य – माहिती मिळविण्यासाठीही नागरिक फोन करू शकतात

वॉर्ड कार्यालये / क्षेत्रिय कार्यालयांचे स्वयंचलन : अधिकार्‍यांना लॉगिनचे अधिकाराद्वारे प्राप्त झालेल्या, निराकरण झालेल्या, पुढे पाठविलेल्या तक्रारींची माहिती प्राप्त करून देणे.

 

नागरिकांना त्यांच्या तक्रारीबाबत तक्रारीचे निराकरण होईपर्यंत तक्रार कोणत्या अवस्थेत आहे याची माहिती एसएमएसद्वारे देत राहणे. तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर त्याबाबतही माहिती देणे.

 

 

अगदी सहजपणे नागरिकांना पुणे महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल करण्याची ही साधी, सोपी पद्धत आहे. याशिवाय पुण्यातील नागरिक जगाच्या पाठीवरील कोणत्याही ठिकाणावरून इंटरनेट आणि संकेस्थळाच्या माध्यमातून त्याची तक्रार दाखल करू शकतो. तक्रार केल्यानंतर तिचे निराकरण होईपर्यंत नागरिक तक्रारीची अवस्था जाणून घेऊ शकतो. यातून नागरिकांचा त्रास कमी होऊन, पारदर्शकता वाढून नागरिकांना प्रत्येक स्तरावरील माहिती मिळते. या व्यवस्थेद्वारे नागरिक आणि जबाबदार कर्मचारी यांनाही तक्रारींच्या अवस्थेची एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात येते.