ABOUT SOCIAL DEVELOPMENT DEPARTMENT

युनिसेफ संस्थेच्या सहकार्याने नागरवस्ती विकास योजना विभागाची सन १९८४ मध्ये स्थापना करणेत आली. पुणे शहरातील झोपडपट्ट्यामध्ये गरोदर माता, सहा वर्षाच्या आतील मुले यांचे लसीकरण करणे, बालवाड्या चालविणे, त्यांना सकस आहार देणे इ. कामे केली जात होती. त्यानंतर सन १९८७ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नागरवस्ती विकास योजना विभाग विलीन करून स्वतंत्र खाते निर्माण केले.

खात्याने झोपडपट्टीतील गरीब, गरजू नागरिकांसाठी काम करणेस सुरवात करून केंद्र व राज्य शासनाच्या एसयूपी योजना राबविनेत येत होती. सन १९९१ ते १९९७ पर्यत नेहरू रोजगार योजना राबविनेत आली. या योजने द्वारे व्यवसायिक प्रशिक्षण व बँके द्वारे कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जात होते. सन १९९७ ते २००० मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पुणे शहर मध्ये साक्षरता अभियान राबविणेत आले. सन २००० पासून केंद्र व राज्य शांसनाच्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणेत येत आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्प संस्थांच्या माध्यमातून राबविनेत येत आहे.