सांस्कृतिक केंद्रांविषयी

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाचे काम हे इतर विभागांपेक्षा काहीसे वेगळे आहे. 'पुर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेही संबोधले जाते. संस्कृती आणि कलेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या पुणेकरांना आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच, पुणे महानगरपालिकेने १३ सांस्कृतिक केंद्रांची तरतूद केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाच्या जबाबदाऱ्यांमध्ये केंद्रांचे चार महिन्यांच्या स्लॉटमधील आरक्षणासंदर्भात व्यवस्थापन, पुणे महानगरपालिकेकडून प्रोत्साहन मिळणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, माहिती व अधिकार कायद्यांतर्गत माहिती पुरविणे, व्यवस्थापक, निर्माते आणि कलाकारांच्या समस्यांचे निराकरण करणे, प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणे इत्यादी कामांचा समावेश होतो.

याशिवाय, शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी सेवा पुरविण्यास सांस्कृतिक विभाग बांधील आहे. यामुळेच सांस्कृतिक केंद्रांचा सरकारच्या आवश्यक सेवांमध्ये समावेश केला जातो. मा. महानगरपालिका आयुक्त, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (मालमत्ता) आणि माननीय उपायुक्तांच्या (मालमत्ता / जमीन अधिग्रहण आणि व्यवस्थापन) नियंत्रणाखाली सांस्कृतिक विभागाचे कामकाज चालते.


या केंद्रांच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना/ इमारत व बांधकाम आणि विद्युत विभागामार्फत पाहिले जाते.