प्राणीसंग्रहालयाचे शैक्षणिक कार्यक्रम
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामार्फत जनसामान्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती व पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. प्राणीसंग्रहालयाच्या अनेक उद्धेशांपैकी एक म्हणजे शिक्षणातून संवर्धन आणि अमुल्य जैवविविधतेबाबतच्या जनजागृतीस प्रोत्साहन देणेसाठी पर्यटकांमध्ये जबाबदारीची जाणीव विभिन्न शैक्षणिक उपक्रमांतून करून देणे. याकरिता प्राणीसंग्रहालयाद्वारे विद्यार्थी, पर्यटक व नागरिकांमध्ये जनजागृती वन्यप्राणी व पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहचविण्यासाठी वेळोवेळी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
प्राणीसंग्रहालयाच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे वेळापत्रक
दिनांक |
कार्यक्रम |
१५ फेब्रुवारी |
महापालिका वर्धापन दिन (फ्लॉवर शो) |
१४ मार्च |
प्राणीसंग्रहालय दिवस |
२० मार्च |
जागतिक चिमणी दिवस |
२१ मार्च |
जागतिक वन दिवस |
२२ मार्च |
जागतिक पाणी दिवस |
२३ मार्च |
जागतिक हवामान दिवस |
१४ एप्रिल |
जागतिक पक्षी स्थलांतर दिवस |
२२ एप्रिल |
वसुंधरा दिन |
२२ मे |
जागतिक जैवविविधता दिवस (उन्हाळी शिबीर) |
५ जून |
जागतिक पर्यावरण दिवस |
२९ जुलै |
जागतिक व्याघ्र दिन |
जुलै |
वनमहोत्सव |
जुलै/ ऑगस्ट |
नागपंचमी |
ऑगस्ट |
रक्षाबंधन |
१० ऑगस्ट |
जागतिक सिंह दिवस |
१२ ऑगस्ट |
जागतिक हत्ती दिन |
२२ सप्टेंबर |
जागतिक गेंडा दिवस |
१ ते ७ ऑक्टोबर |
वन्यजीव सप्ताह |
नोव्हेंबर |
प्राणी पंधरवडा |
संपूर्ण वर्षभर |
प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे वाढदिवस |
प्राणीसंग्रहालयाचे नियमित शैक्षणिक उपक्रम
- मोफत दोन दिवसीय कार्यशाळा ‘ओळख प्राणीसंग्रहालयाची’
- मोफत अर्धा दिवसाची कार्यशाळा ‘मैत्री करूया प्राणीसंग्रहालयाशी’
- मोफत तीन दिवसीय उन्हाळी शिबीर ‘झू बियोंड द बॉनड्री’
- मोफत ओरीयन्टेशन प्रोग्राम
- मोफत गाईडेड टूर
टिप्पणी
वरीलपैकी कोणत्याही शैक्षणिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्ती/ शाळा/ संस्थानी कृपया प्राणीसंग्रहालयाच्या शैक्षणिक अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२०- २४३६७७१२ (ऑ.) या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा rajivgandhizoo [at] punecorporation [dot] org (subject: Regestration) ( ) या पत्यावर ईमेल करावा.
प्राणीसंग्रहालयाच्या स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील अर्ज भरून पाठवा