Quick Links

Array

पुणे महानगरपालिकेचा मध्यवर्ती भांडार विभाग सन १९५० मध्ये स्थापन झाला. भांडार विभागप्रमुख यांच्या नियंत्रणाखाली या मध्यवर्ती भांडार विभाग नियंत्रण केंद्राचे कार्य चालते. विभागामार्फत पुणे महानगरपालिकेच्या इतर विविध विभागांना स्टेशनरी साहित्य /गणवेश, विद्युत उपकरणे / हार्डवेअर आदी वस्तू त्यांच्या मागणीनुसार पुरविल्या जातात. या प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ७३ अन्वये जाहीर निविदा मागवून सर्वसाधारणपणे सर्वात कमी दर आलेल्या व उत्तम प्रतीच्या साहित्याची खरेदी करून मनपाचे हित लक्षात घेऊन साहित्य पुरविले जाते. 

पुणे महानगरपालिकेचा मध्यवर्ती भांडार विभाग विविध विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांना स्टेशनरी/ गणवेश/ हार्डवेअर /विद्युत उपकरणे/ आरोग्य खात्यासाठी कीटक नाशक औषधे अशाप्रकारचे २९३ प्रकारचे साहित्य पुरवितो. हे साहित्य पुरवण्यासाठी विभागामार्फत निविदा काढली जाते. निविदेच्या प्रक्रियेमुळे निविदाधारकांमध्ये स्पर्धा निर्माण होते. यामुळे पुणे महानगरपालिकेला कमी दरात चांगल्या प्रतीचे साहित्य खरेदी करता येते. पर्यायाने, पुणे महानगरपालिकेचा आर्थिक लाभ करणे हा यामागील उद्देश आहे.

विभाग माहिती

HOD's Note
पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांना आवश्यक असलेले प्रत्येक साहित्य संबंधित विभागाकडील मागणीनुसार तातडीने उपलब्ध करून देणेची कार्यवाही तसेच मा. सभासद व मा. आमदार / मा. खासदार यांचे (DPDC अंतर्गत उपलब्ध तरतुदीनुसार) मागणीनुसारही मध्यवर्ती भांडार कार्यालयामार्फत नागरिकांकरीता लोकोपयोगी साहित्यांची निविदेद्वारे खरेदी करून उपलब्ध करून देणेची कार्यवाही करण्यात येते. मध्यवर्ती भांडार कार्यालय हे स्टेशनरी, गणवेश, हार्डवेअर, आरोग्य विद्युत अशा 5 उपविभागात विभागलेले असून सदर उपविभागांतर्गत विविध कामकाज केले जातात.
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. सुनील इंदलकर

पदनाम: उपआयुक्त

ई-मेल आयडी: centralstore@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 7796652961

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. अनिल सागर

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: centralstore@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9970128809

विभागाची माहिती

विभाग पत्ता: मध्यवर्ती भांडार विभाग, खोली क्रं.३२८ , तिसरा मजला , मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे ४११ ००५ .

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: centralstore@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents
image