सौरऊर्जेचे फायदे

सौरऊर्जा वापरणाऱ्यांसाठी कर सवलत

पुणे शहरात दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वापर वाढत आहे. शहरात सौरऊर्जेच्या वापरास अत्यंत अनुकूल वातावरण आहे. सध्या शहरातील २० टक्के घरांमध्ये पाणी तापविण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रांचा(सोलार वॉटर हिटर) वापर केला जातो. केंद्र सरकार आणि स्थानिक संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. सोलार वॉटर हिटरचा दीर्घकालीन उपयोग पाहता हे तंत्रज्ञान फारसे महाग नाही. एका कुटुंबाला या यंत्राच्या खरेदीसाठी सुमारे 25,000 रुपये खर्च येतो.

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून चालविल्या जाणार्या सॉफ्ट लोन योजनेमार्फत सोलार वॉटर हिटिंग यंत्रणेच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारकडून यासाठी मिळकत करात 5 टक्के सवलत आणि इंटरेस्ट सबसिडी दिली जाते.

नोंदणीकृत संस्था आणि व्यावसायिक कंपन्यांना सोलार वॉटर हिटींग सिस्टमच्या स्थापनेसाठी कॅपिटल सबसिडी दिली जाते.

नागरिकांना संबंधित प्रभाग कार्यालयात अर्ज करुन करसवलतीचा लाभ घेता येईल. यासाठी साधा अर्ज आणि सोलार सिस्टमचा फोटो सादर करावा लागेल.