Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

परवाना व आकाशचिन्ह हा पुणे महानगरपालिकेचा एक स्वतंत्र विभाग आहे. हा विभाग मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांच्या नियंत्रणाखाली आहे. या विभागामार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सन १९४९ चे कलम २४४ अन्वये शहरातील निरनिराळ्या प्रकारच्या जाहिरात करणाऱ्या फलकांना व त्याचप्रमाणे नाम दर्शविणाऱ्या नाम फलकांना परवानगी दिली जाते. तसेच कलम २४५ अन्वये अनधिकृत जाहिरात फलक काढण्याबाबत कार्यवाही केली जाते. शहरात वीज व वाफ यावर चालणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचा वापर करून व्यवसाय करण्यासाठी तसेच पेट्रोल, गॅस, शोभेची दारु, रसायने व इतर वस्तूंचा (ज्वालाग्रही पदार्थाचा) साठा करण्यास परवानगी दिली जाते. जाहिरात फलक उभारताना शहराच्या सौंदर्यास धक्का लागणार नाही, सार्वजनिक रहदारीला अडथळा व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने जाहिरात उभारण्यास परवानगी दिली जाते. परवानगीची मुदत ही फक्त ६ महिने असते. जाहिरात शुल्क हे पुढील सहा महिन्याचे अग्रीम स्वरुपात स्विकारले जाते. यानंतर सदर परवान्याचे नुतनीकरण परवानाधारकाकडून करण्यात येते. व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या परवान्याची मुदत ही १२ महिने इतकी असते.

पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत खालील कामे केली जातात- 

  • जाहिरात फलक/नामफलक परवानगी /नुतनीकरण.
  • वीज पाणी व वाफ यांवर चालणार्या मशिनरीसाठी मशिनरी परमिट देणे.
  • ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यासाठी साठा परवाना देणे 
  • शहर हद्‌दीतील अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, व्यवसायाबाबत येणा–या तक्रारींवर कारवाई करणे
  • मान्यताप्राप्त फलक, परमिट, परवाना नियमांनुसार परवाना व सांकेतिक क्रमांक देणे.
  • उत्सवादरम्यान मान्य धोरणांनुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या हंगामी जाहिरात फलक, बोर्ड लावण्यास परवानगी देणे.
  • मान्य धोरणाअंतर्गत नागरिक/संस्था/मंडळे यांना मंडप व कमान उभारणीस परवानगी देणे

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. संजय गावडे

पदनाम: उप आयुक्त (परवाना व आकाश चिन्ह )

ई-मेल आयडी: sanjaygawde@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931401

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. संजय अर्जुन पोवळ

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: skysign@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9112290208

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. सीमा रमाकांत बोरकर

पदनाम: कनिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: skysign@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9011751184

विभागाची माहिती

विभाग पत्ता: तळमजला, सावरकर भवन, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५

दूरध्वनी क्रमांक: +91 20 25506676

ई-मेल आयडी: skysign@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents
image