विद्युत विभाग

Select Illuminations and Projects

रस्त्यांवरील रोषणाई

पथदिव्यांचे केंद्रीय वायरलेस नियंत्रण:

वीजबचत –दिवे सुरु आणि बंद करण्यात वक्तशीरपणा आणून तसेच सातत्याने प्रकाश मिळेल याच अशा प्रकारची असा वीजेचा प्रवाह राखला जातो. यातून वीजबचत होते.

देखभाल खर्चात कपात-

शहरातील प्रत्येक दिव्याच्या स्थितीचे ग्राफिकल दृश्य उपलब्ध असते तेव्हा रात्री दिव्यांवर लक्ष ठेवण्याची गरज उरत नाही. केंद्रीय नियंत्रण प्रणालीमुळे देखभाल करणार्या टीमला केवळ खरी गरज असेल तेव्हाच काम करावे लागते.

 

नागरी सुरक्षेत सुधारणा :

पथदिवे हा भावनात्मक मुद्दा आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर पथदिवे आवश्यकच आहेत. यामुळेच केंद्रीय नियंत्रण प्रणालीद्वारे दिव्यांवर लक्ष ठेवले जाते.

 

केंद्रीय नियंत्रण प्रणाली :

पथदिव्यांचे व्यवस्थापन हा क्लिष्ट विषय असून त्यासाठी भरपूर खर्च येतो. केंद्रीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे पथदिव्यांचे नियंत्रण केल्यास एकावेळी अनेक दिव्यांवर नियंत्रण करता येते. यामुळे कामात सुलभता येते आणि देखभालीचा खर्च कमी होतो.केंद्रीय नियंत्रण प्रणालीचे फायदे

  • बिघाड झाल्यास त्वरित सूचना
  • दिवसा वीजेची बचत
  • नव्या वैशिष्ट्यांचे मॉनिटरिंग
  • बिघाडास त्वरित प्रतिसाद देण्याची सोय
  • रात्री देखभाल करण्याची गरज नाही
  • ऊर्जेची बचत

 

सद्गुरु शंकर महाराज पुल, धनकवडी येथे ‘कलर चेंजिंग लाईट्स’