पुणे- ‘मॅक्सिमम सोलार सिटी’

 

कोणत्याही स्मार्ट सिटीमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून तयार झालेल्या वीज वापराचे प्रमाण १० टक्के असायला हवे. पुणे शहराने हे लक्ष्य अधिक प्रभावीपणे साध्य करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत, सुरुवातीला शहरातील औंध, बाणेर आणि बालेवाडी परिसरात ‘रुफटॉप सोलार’ तंत्रज्ञानाद्वारे सुमारे 15 ते 20 टक्के वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. यासाठी, महापालिकेने महाराष्ट्र वीज वितरण मंडळ(एमएसईबी) आणि महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी(एमईडीए) या दोन सरकारी संस्थांनादेखील सहभागी करुन घेतले आहे. तसेच पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि प्रयास एनर्जी ग्रुप या दोन थिंक टॅंक्सची मदत घेण्यात आली आहे. महापालिकेने या दोन्ही संस्थांसोबत मिळून पुणे शहराला मॅक्सिमम सोलार सिटी बनविण्यासाठी धोरण तयार केले आहे. याद्वारे, महापालिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जेसंदर्भात जाहीर केलेल्या धोरणास हातभार लावत आहे. केंद्र सरकारने येत्या २०२२ पर्यंत १०० गिगावॅट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगले असून यापैकी ४० गिगावॅट ऊर्जा रुफटॉप सोलार तंत्रज्ञानातून करण्याचा हेतू आहे.