उद्यान रोषणाई

हजरत सिद्दीकी उद्यानातील संगीत कारंजे :

पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने कॅम्प परिसरातील हजरत सिद्दीकी उद्यानात संगीत कारंजे बसविले आहेत. एसएस 304 स्टीलपासून तयार झालेल्या कारंज्याचा 24X15 मीटरएवढा आकार आहे. कारंज्याला विविध प्रकारचे सुमारे 13हजरत सिद्दीकी उद्यानातील संगीत कारंजे- 0 नॉझल्स आहेत. विविध आकाराचे सोलनॉइड वॉल्व वापरुन या नॉझल्सचे नियंत्रण केले जाते. पाण्याखाली बसविलेले एलईडी दिव्यांमधून येणाऱ्या प्रकाशाचा दर्जा स्थिर असून यासाठी कारंज्यात मल्टीकलर आरजीबी ऑपरेशनमध्ये 600 एलईडी प्लेट्स बसविलेल्या आहेत. या सर्व दिव्यांचे पाणी आणि बाहेरील वातावरणापासून संरक्षण होईल याची पुर्ण काळजी घेण्यात आली आहे.

 

वसंतराव बागुल उद्यान संगीत कारंजे :

उद्यानाला भेट देणार्या पर्यटकांसाठी दररोज संगीत कारंज्यांचा कार्यक्रम असतो. लेझर आणि ऑडीओ प्रोग्रॅमिंगचा वापर आणइ आरजीबी लेझर प्रोजेक्टर तंत्रज्ञानामुळे कारंज्यातील रोषणाई उठून दिसते. पाण्यापासून तब्बल तीस वेगवेगळ्या प्रकारची प्रात्याक्षिकं दाखविली जातात. कारंज्याच्या ऑडिओ सिस्टमसाठी पल्झ I डिजिटल डॉल्बी या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. कार्यक्रमाची ध्वनी यंत्रणा चांगली राहावी यासाठी चार प्रमुख आणि चार स्पीकर्स भोवताली ठेवण्यात आलेले आहेत. कार्यक्रम व्यवस्थितपणे चालावा यासाठी विभागाने टच स्क्रीनद्वारे सर्व कंट्रोल हाताळला आहे. दररोज १५ मिनिटांच्या अंतराने ४ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

 

पु.ल. देशपांडे उद्यान आणि मुघल गार्डनमधील रोषणाई :

 

पु.ल. देशपांडे उद्यान फेज-II (मुघल गार्डन):

या उद्यानात सहा कारंजे आहेत. संध्याकाळच्या वेळी हे कारंजे उजळून निघावेत यासाठी पाण्याखाली सुमारे १४० दिवे बसविण्यात आले आहेत. कारंज्यातील प्रात्याक्षिकांसाठी सुमारे १२ पंपांचा वापर केला जातो .

 

छत्रपती शिवाजी उद्यान, वडगाव शेरी येथील संगीत कारंजे आणि मल्टीमिडीया शो :

डीएमएक्स कंट्रोल्ड स्वतंत्रपणे चालणार्या नॉझल्सचा वापर