• अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग

  अधिक वाचा
 • अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग

  अधिक वाचा

Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग हे एक स्वतंत्र खाते असून, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेटस्) यांच्या नियंत्रणाखाली आहे. या विभागाचे कार्यालयीन कामकाज १५ क्षेत्रिय कार्यालयांमधून होत असून त्याचे नियंत्रण म.न.पा. भवन, पुणे शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयामार्फत केले जाते.

उद्दीष्टये :-

 • नागरिकांना अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर फेरीवाले यांचा कुठलाही त्रास होणार नाही.
 • "फेरीवाला क्षेत्र" व "ना- फेरीवाला क्षेत्र" घोषित करणे व फेरीवाल्यांचे "ना- फेरीवाला क्षेत्र" मधुन "फेरीवाला क्षेत्रामध्ये" पुर्नवसन करणे.
 • पुणे शहराची फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे.
 • पदपथ, रस्ते इ. वरील बेकायदेशीर अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाले यांचे अतिक्रमण काढणे.
 • दवाखाने, रेल्वे स्टेशन, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच सायलेन्ट झोन इ. परिसर फेरीवाले अतिक्रमण मुक्त ठेवणे.
 • उत्सवा दरम्यान तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप, सभा मंडप इ. उभारण्यासाठी परवानगी देणे आणि कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे.

या विभागाचे कामकाज "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९" मधील खालील कलमांनुसार चालते.  

        • कलम २२७ – दुकांनाकरीता झाप/फळी परवाना देणे.

        • कलम २३१- मनपा हद्दीतील पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे.

        • कलम २३४ - उत्सवा दरम्यान तात्पुरते मंडप उभारण्यासाठी परवानगी देणे.

        • कलम २३९- तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवण्यास परवानगी देणे.

        • कलम ४३८– अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य योग्य ते शुल्क आकारुन

               नियमानुसार सोडवून देणे.

             - जप्त साहित्यांचा लिलाव करणे.

 • "पथ विक्रेता अधिनियम-२०१४" नुसार शहरातील पात्र फेरीवाल्यांना व्यवसाय परवाने देणे, परवाना शुल्क वसूल करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.

 

कर्तव्ये व जबाबदा-या :-

      • अतिक्रमण विभागाचे मुख्य काम महानगरपालिकेच्या रस्ते/पदपथावरील अतिक्रमण हटविणे आहे.

 • रस्ते/पदपथावरील अनधिकृत बांधकाम यांचे "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९" नुसार निरीक्षण करणे.
 • रस्ते/पदपथावरील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण बाबत येणा–या तक्रारींवर योग्य ती कारवाई करणे.
 • पात्र फेरीवाल्यांना "पथ विक्रेता अधिनियम-२०१४" नुसार परवाना व ओळखपत्र देणे.
 • अधिकृत फेरीवाले किंवा परवानाधारक यांचे "पथ विक्रेता अधिनियम-२०१४" नुसार पुनर्वसन करण्यासाठी ओटा मार्केट/मार्केट चे बांधकाम करणे.
 • स्टॉल/हातगाडी/पथारी अधिकृत परवाना वारसहक्का नुसार वारसास प्रदान करणे.
 • फेरीवाल्यांना मागणी अर्जानुसार दुबार परवाना देणे.
 • फेरीवाल्यांच्या मागणी अर्जानुसार त्यांच्या परवान्यातील व्यवसाय प्रकार बदलून देणे.
 • उत्सवा दरम्यान मान्य धोरणांनुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या हंगामी व्यवसायास परवानगी देणे.
 • मान्य धोरणाअंतर्गत नागरिक/संस्था/मंडळे यांना मंडप/कमान उभारणीस परवानगी देणे.
 • सरकारी व खाजगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणे.
 • मान्य धोरणाअंतर्गत शेतकरी समुह गटांना शेतकरी आठवडे बाजार भरविणेकरीता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांना मोकळ्या जागा भाडे कराराने उपलब्ध करून देणे.

 

LIST OF HAWKERS/ VENDORS

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. माधव जगताप

पदनाम: उपआयुक्त

ई-मेल आयडी: madhav.jagtap@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931457

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती कांचन खिरीड

पदनाम: लघु लेखक

ई-मेल आयडी: encroachment1@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9763884181

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.नितीन सोनवणे

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी: sonwane.nitin60@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9860790233

विभागाची माहिती

विभाग पत्ता: ११९, पहिला मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: encroachment1@punecorporation.org

HOD's Note

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. माधव जगताप

पदनाम: उपआयुक्त

ई-मेल आयडी: madhav.jagtap@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931457

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती कांचन खिरीड

पदनाम: लघु लेखक

ई-मेल आयडी: encroachment1@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9763884181

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.नितीन सोनवणे

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी: sonwane.nitin60@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9860790233

विभागाची माहिती

विभाग पत्ता: ११९, पहिला मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: encroachment1@punecorporation.org

Public Disclosure

Key Documents

image