विद्युत विभाग

Select Illuminations and Projects

इको-फ्रेंडली स्मशानभूमी

वायूप्रदुषण नियंत्रण प्रणाली

विद्युत विभागाने शहरातील विविध स्मशानांमध्ये वायूप्रदुषण नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे. अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीला ही यंत्रणा चांगला पर्याय ठरु शकते. या यंत्रणेतील वॉटर स्क्रबरमार्फत अंत्यसंस्कारातून निर्माण झालेल्या धूरातील कार्बन शोषून घेतला जातो आणि फिल्टर झालेला धूर बाहेर सोडतो. यामुळे प्रत्येक अंत्यसंस्कारामागे 150 किलो लाकडांची बचत होण्यास मदत होते. शहरात वैकुंठ, हडपसर, धनकवडी, कात्रज, येरवडा आणि कैलास स्मशानभूमीत ही यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

 

विद्युतदाहीनी -

इलेक्ट्रिकल स्मशानभूमीमध्ये खालील गोष्टी असतात :

 1. मुव्हेबल ट्रॉली
 2. भट्टी(फरनेस)
 3. व्हेंचर स्क्रबर असलेली गॅस क्लिनिंग यंत्रणा
 4. 100 फूट उंच चिमणी
 5. कंट्रोल्स

यंत्रणेची कार्यपद्धती :

 • सुरुवातीला मृतदेहाला ‘रिटॉर्ट’ म्हणजे कम्बशन चेंबरमध्ये ठेवले जाते. या चेंबरभोवती अत्यंत उष्णतेत टिकून राहणार्या विटा मांडलेल्या असतात, तसेच संपुर्ण भट्टीच्या तळालादेखील छिद्रे तयार करण्यात आलेली आहेत.
 • या यंत्रणेसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्याची गरज नाही. केवळ 220 व्होल्ट इलेक्ट्रिकल आऊटलेट पुरेसे आहे
 • इलेक्ट्रिक क्रिमेशन भट्टीची कार्यक्षमता 54 किलोवॅटएवढी आहे. इलेक्ट्रिक हिंटींग कॉईल नायक्रोम(NICHROME) 80/20 पासून बनविली जाते.
 • अंत्यसंस्काराच्या संपुर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 60 ते 90 मिनिटांचा कालावधी लागतो.
 • अंत्यसंस्कारावेळी बाहेर पडणारा हानिकारक धूर व्हेंचर स्क्रबर यंत्रणेद्वारे गाळला जातो आणि हवेत फिल्टर्ड वायू सामील होतो.
 • इलेक्ट्रिक स्मशानभूमीचे सर्व कंट्रोल्स सुरक्षित आहेत. 

 

 

गॅस स्मशानभूमी

एलपीजी गॅस स्मशानभूमीमध्ये खालील गोष्टी असतात :

 1. अंत्यसंस्कारासाठी भट्टी
 2. व्हेंचर स्क्रबर असणारी एलपीजी गॅस कम्बशन यंत्रणा
 3. 100 फूट उंच चिमणी
 4. कंट्रोल्स
 5. एलपीजी गॅस ऑटोमॅटिक बर्नर हे फॅन, मोटर, पम्प, इग्निशन ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रोड, फ्लेम सेन्सर, सिक्वेन्स कंट्रोल, गॅस सोलेनॉईड व्हॉल्व, एअर प्रेशर स्विच आणि गॅस प्रेशर स्विच असते.

कार्यपद्धती :

 

 • मुव्हेबल ट्रॉलीद्वारे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मंचावर ठेवला जातो. त्यानंतर, यंत्राचे दार बंद केले जाते.
 • त्यानंतर भट्टीचे तापमान 850 डिग्री केले जाते
 • एलपीजी गॅस क्रिमॅटोरियममध्ये प्रायमरी आणि सेकंडरी चेंबर्स असतात
 • ही यंत्रणा उच्च दर्जाच्या अॅल्युमिनियम विटांपासून तयार केलेली असते. या विटा अत्युच्च तापमानातदेखील टिकून राहतात.
 • मृतदेहावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी 60 ते 90 मिनिटांचा कालावधी लागतो.
 • या यंत्रणेत अंत्यसंस्कारानंतर राख सांभाळून ठेवली जाऊ शकते.